Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रHSC Result : असा लागणार महाराष्ट्र बोर्डाचा निकाल

HSC Result : असा लागणार महाराष्ट्र बोर्डाचा निकाल

सीबीएसई (CBSE) आयसीएसई (ICSE)बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या निकालाचे सूत्र तयार केले होते. त्यानंतर १५ दिवसांना महाराष्ट्र बोर्डाने (HSC Borad) निकालाचे सूत्र तयार केले आहे. सीबीएसई (CBSE) सूत्राप्रमाणे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लावण्यात येणार आहे. ३० : ३० : ४० या पद्धतीनेच राज्याचा बारावीचा निकाल लागणार आहे.

भारतातील नवीन लस Zydus Cadila , इंजेक्शनची गरज नसणार, मुलांसाठी चालणार का?

- Advertisement -

सीबीएसईच्या (CBSE) बारावीचे सूत्र असे होते.

दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण घेतले जातील. त्याचप्रमाणे अकरावीच्या सरासरी पाच विषयांची सरासरी घेण्यात येणार आहे. 12 वीच्या पूर्व-बोर्ड परीक्षा व प्रॅक्टिकल गुण घेण्यात येतील. दहावीच्या गुणांची 30%, 11 व्या गुणांच्या 30% आणि 12 वी च्या 40% गुणांवर आधारित निकाल असेल.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालंत परीक्षेचा निकाल ३० :३०: ४० या पद्धतीने लावण्यात येणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित ३० टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तर दुसरीकडे अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन आतील विषयनिहाय गुण याचा ३०टक्के विचार केला जाईल इयत्ता बारावी वर्षभरात अंतर्गत मूल्यमापन आतील प्रथम सत्र परिक्षा सराव परीक्षा सराव चाचण्या तसेच मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण ४० टक्के ग्राह्य धरले जाणार आहेत.

दहावी मार्क्स यावर ३० टक्के

११ इयत्ता मार्क्स यावर सरासरी ३० टक्के

१२ इयत्ता यासाठी अंतर्गत परिक्षा यावर ४० टक्के गुण असतील

इयत्ता १२वी च्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या