Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात रोज दहा लाख लस देण्याचेे नियोजन

राज्यात रोज दहा लाख लस देण्याचेे नियोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या (Corona ) तिस़र्‍या लाटेत डेल्टा प्लस व्हेरींयंटचा धोका काळजी करण्यासारखा असल्यानेच राज्यभरातील यंत्रणेला आवश्यक त्या उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंंटे ( Chief Secretary of State Sitaram Kunte ) यांंनी दिली.

- Advertisement -

कुंटे म्हणाले की, पहिल्या लाटेत 19 लाख बाधीत होते. दुस़़र्‍या लाटेत चाळीस लाख बाधित झाले. पहिल्या लाटेच्या वेळी केवळ 8 टक्के बाधितांना प्राणवायुची गरज भासली. व दुस़र्‍या लाटेत 15टक्के रुग्णांंना प्राणवायु द्यावा लागला. आता तिसरी लाट त्यापेक्षा भयानक असल्याचे सांंगण्यात येत असल्यानेच प्राणवायूचा साठा वाढवा, खाटा संख्या वाढवा अशा सूचना दिल्या आहेत.

तिसरी लाट येऊ नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र आलीच तर तिच्याशी लढण्याचे बळ आपल्याजवळ असावे असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. राज्यात रोज दहा लाख लस देता येतील असे नियोजन झाले आहे. सध्या सात लाखापयर्ंंत रोज लस देता येत आहे.

केंद्राकडून लसीचा पुरवठा होताच त्या दिल्या जातील. जुलै महिन्यात सव्वा कोटी लस देण्याचे केंंद्र शासनाने मान्य केले आहे. आजही महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर आहे. करोनामुळे खासगी भागीदारीतून होणा़र्‍या विकासकामांंनाही शासनाने मुदतवाढ देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ती कामे आगामी काळात निश्चीत होतील, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या