Friday, May 3, 2024
Homeनगरउड्डाणपुलाच्या कामाने नागरिक त्रस्त

उड्डाणपुलाच्या कामाने नागरिक त्रस्त

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

सक्कर चौक ते सरोज टॉकिजपर्यंत (Sakkar Chowk to Saroj Talkies) उड्डाणपुलाचे काम (Flyover work) सुरु आहे. या कामामध्ये नियोजन नसल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे छोट-मोठे अपघात होत असून ट्रॅफिकही जाम (Traffic jams) होत असून नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शिव राष्ट्र सेनेच्यावतीने (Shiv Rashtra Sena) राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व उपमहाप्रबंधक प्रकल्प संचालक पी. बी. दिवाण यांना निवेदन देऊन रस्त्यांचे कामे तातडीने व्हावीत, अन्यथा अर्धनग्न आंदोलन (Movement) केले जाईल, असा इशारा (Hint) देण्यात आला आहे.

- Advertisement -

यावेळी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राधाकिसन कुलट, तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेडाळे, शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे आदि उपस्थित होते. सक्कर चौक ते सरोज टॉकीजपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ते, त्याचबरोबर पिण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेज लाईन आदिंसह इतरही लाईन तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक भागात पिण्याचा पाण्याचा (Drinking Water), ड्रेनेज, टेलीफोन, इंटरनेट सेवा आदींची समस्या निर्माण (Problem creation) झाल्या आहेत. संबंधित एजन्सीने वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे या मार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना जाता येता मोठा त्रास होत असून छोट-मोठ्या अपघाताबरोबरच अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. यामुळे तातडीने या रस्त्याचे कामे व्हावीत, अन्यथा अर्धनग्न आंदोलन केले जाईल, असा इशाराही (Hint) या निवेदनात दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या