Monday, May 6, 2024
Homeनंदुरबारप्रकाशा येथे विषारी गवत खाल्याने 12 मेंढयांचा मृत्यू

प्रकाशा येथे विषारी गवत खाल्याने 12 मेंढयांचा मृत्यू

वैजाली – Shahada – वार्ताहर :

शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसरात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास विषारी गवत खाल्यामुळे सुमारे पंचवीस मेढयांना अचानकपणे विषबाधा झाली. यात बारा मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, वेळीच औषधोपचार झाल्याने इतर मेंढ्याचा जिव वाचला असला तरी गरीब मेंढपाळांचे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

नंदुरबार तालुक्यातील वटबारे येथील लिंबा सोमा ठेलारी हे दरवर्षी शहादा तालुक्यात मेंढ्या चारण्यासाठी येत असतात. यावर्षी अनरदबारी पुसनद परिसरात मुक्काम होता.

नुकताच पावसाळा सुरुवात झाल्याने ते आपल्या पडावासह आपल्या गावाकडे परतत असताना प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसरात नवीन वसाहतीत मेंढ्या चालतांना पंचवीस ते तीस मेढंयानी तणनाशक व विषारी गवत खाल्ल्याने विषबाधा झाल्याने बारा मेंढ्याचा मुत्यू झाला.

प्रकाशा व भालेर येथील पशुवैद्यकीय कर्मचारी यांनी वेळीच औषधोपचार करून उर्वरीत मेंढ्याचे प्राण वाचवले.

यात मेंढपाळाचे पन्नास ते साठ हजार रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत मयत मेंढयांसाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारची भरपाईची तरतुद नसल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या