Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियाचे नियोजन

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियाचे नियोजन

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची (International Sports University ) मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून रोवली जात असून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेशप्रक्रिया राबविण्याबाबतचे नियोजन करण्यात आल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Sports and Youth Welfare Minister Sunil Kedar ) यांनी दिली, तर विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पदांची भरतीप्रक्रिया आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करावी, अशी सूचना खासदार शरद पवार ( MP Sharad Pawar ) यांनी केली आहे.

- Advertisement -

राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या अनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी बोलताना पवार यांनी, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आदी महत्त्वपूर्ण जागा भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे सांगितले. त्याचबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असेही पवार म्हणाले.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले प्रशिक्षक तयार होतील. राज्यातून चांगले खेळाडू तयार होतील,असा विश्वास व्यक्त करत सुनील केदार यांनी कुलगुरू आणि प्राध्यापकांची निवड तातडीने करून प्रवेश प्रक्रियेला वेग द्यावा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, क्रीडा विद्यापीठाने ‘ऑन फिल्ड’ आणि ‘ऑफ फिल्ड’वर काम करून प्रशिक्षणावर अधिक भर द्यावा. तसेच चांगले प्रशिक्षक तयार करून त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील असे नियोजन करणे आवश्यक आहे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण या विद्यापिठाच्या माध्यमातून येथे उपलब्ध होईल. या विद्यापीठांतर्गत शालेय स्तरावरील क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या