Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - कुंभ Quarterly Future - Aquarius

त्रैमासिक भविष्य – कुंभ Quarterly Future – Aquarius

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑगस्ट – 2021

- Advertisement -

आठवड्याच्या सुरुवातीला राशिस्थानी गुरु-नेपच्यून, तृतीयात हर्षल, चतुर्थात राहू , षष्ठात रवि-बुध, सप्तमात मंगळ- शुक्र, दशमात केतू , व्ययात शनि प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे

तुमची रास – राशीची अध्यक्षारे गो, सा,सी, सो, सो, से अशी आहे. राशीचे चिन्ह हातात घट घेतलेला पुरुष आहे. राशीस्वामी शनी. तत्त्व वायू. राशीस्वामी स्थिर असल्याने जीवनात कोणत्याही प्रकारचा बदल होणे आवडत नाही. रागाचा पारा जितक्या लवकर वर चढतो तितक्याच वेगाने तो खाली येतो. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशी लिंग पुरुष. तमोगुणी स्वभाव. काहीसा क्रूर. प्रकृती कफ वात पित्त यापैकी कोणाचीही संतुलन बिघडले की शारीरिक त्रास संभवतो. राशीचा अंमल पायाच्या पोटर्‍यावर आहे. पायाला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. शुभ रत्न नीलम, शुभ रंग आकाशी निळा व काळा. देवता शनि व हनुमान शुभ. अंक 8. शुभ तारखा 8,17,26.

व्ययात शनि आहे. धार्मिक बाबतीत तुमची स्वतंत्र मते असतील. तर ईश्वरावर पूर्ण श्रद्धा राहील. आळसाचा आळस करावा. उत्साहाने कामाला लागा यश तुम्हाला शोधत येईल. शनीला मेहनत कष्ट करणारी व्यक्ती आवडते फळ देताना तो विलंब करतो खरा पण हात आखडता घेत नाही.

एकादशात प्लुटो आहे आकस्मिक रीतीने धनलाभ होण्याचा योग संभवतो.

स्त्रियांसाठी – सप्तमात शुक्र आहे वैवाहिक सुख चांगले राहील. नवविवाहितांच्या भाग्योदय होईल. लोकरंजन करणार्‍या संस्थांमधून प्रगती होऊन प्रयत्न केल्यास आर्थिक लाभ होईल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा -4, 5, 9, 10, 11, 13, 14, 15,19, 20, 22, 25, 26, 27, 28, 30, 31

सप्टेंबर – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशिस्थानी गुरू- नेपच्यून, तृतीयात हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात रवी मंगळ, अष्टमात बुध शुक्र, दशमात केतू, व्ययात प्लूटो अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात मंगळ आहे . कौटुंबिक सुखात अडथळे येण्याची शक्यता आहे. अविवाहित तरुण-तरुणींनी प्रेमविवाहाचा भानगडीत पडू नये. विवाहित आणि घरातले कलह घरातच मिटवावे, व्यापार्‍यांनी सौदे पुढे ढकलावे.

अष्टमातील बुध शत्रुंचा नाश करण्यास समर्थ आहे. तुमच्या यशामुळे निर्माण झाले शत्रू स्वतःच्या दृष्ट कारावायांत अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायाच्या संबंधित आलेले पाहुणे खुश होऊन तुमची समाजातील छबी उजळेल प्रगती होईल.

दशमातील केतूमुळे शत्रूंचा नाश करणे सहज शक्य होईल नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना नोकरी मिळण्याचे योग आहे. कारागिरी आवश्यक असलेले काम चांगले जमेल. प्रवास घडेल त्यातून आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे. वाहन चालविताना सावध रहा.

स्त्रियांसाठी -अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 1, 3, 7, 8, 9, 10, 13, 14, 15, 16, 19, 21, 23, 29, 30

ऑक्टोबर – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशिस्थानी नेपच्यून, तृतीयात हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात रवि मंगळ, बुध, दशमात शुक्र केतू ,लाभात गुरू शनी अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमस्थानी असलेल्या रवीमुळे नवविवाहितांना लाभ होईल. विवाहानंतर भाग्योदय सुरू झाल्याची प्रचिती येईल. नववधू वर असलेल्या प्रेमामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणामुळे घरातील मंडळी विषयी पटणार नाही लहान लहान गोष्टी वरून कलह निर्माण होईल.

व्ययस्थानी गुरू आहे वितंडवादावर नियंत्रण ठेवावे. ब्रह्मांडाच्या पाठीमागे असलेल्या ईश्वरी सत्तेबद्दल विश्वास वाटणार नाही. विनाकारण भटकण्याची सवय कमी करा. पैसा खर्च करू नका. नातेवाईकांशी पटणार नाही. कुणाशी मैत्री करावी आणि कोणाशी करू नये याचा विवेक बाळगावा.धार्मिक संस्थेचे अधिपत्य करू शकाल अध्यात्मात प्रगती होईल कर्ज पासून दूर राहा. घ्यावे लागले तर हप्ते वेळेवर भरा.

तृतीयात हर्षल आहे लेखक वर्गासाठी चांगला आहे लेखनात सूर्य लागेल प्रसिद्धी मिळेल नावलौकीक वाढेल. ग्रंथ प्रकाशनाच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे विचित्र स्वभावाचे लोकांपासून दूर रहा हा नाही तर नुकसान होईल.

स्त्रियांसाठी – दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी – शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 2, 3, 8, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 24, 26, 28

- Advertisment -

ताज्या बातम्या