Friday, May 3, 2024
Homeनाशिकअसा आहे जिल्ह्यातील धरणसाठा, गंगापूर पोहचले 'इतक्या' टक्क्यांवर

असा आहे जिल्ह्यातील धरणसाठा, गंगापूर पोहचले ‘इतक्या’ टक्क्यांवर

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यात (Nashik district) गेल्या तीन दिवसांपासून पाऊस (Rain) सुरु झाल्याने ५४ टक्क्यांवर स्थिरावलेला पाऊस आता ५७ टक्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. गत वर्षी याच दिवसात पावसाने ७३ टक्के सरासरी ओलांडली होती. येत्या पंधरा दिवसा पावसाची कृपा राहिली तर ती सरासरीही ओलांंडली जाईल, अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस आतापर्यंत नाशिक, चांदवड (Chandwad), सिन्नर (Sinnar) तालुक्यात झाला आहे. नाशिकला ३३, चांदवडला २५ व सिन्नरला (Sinnar) ३७ टक्के पाऊस झाला आहे. पाऊस कमी झाला असला तरी सुदैवोने गंगापूर धरण (Gangapur Dam) ८० टक्के भरले आहे.

गंगापूर धरण समुहात ७० टक्के साठा झाला आहे. दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी धरणातुन विसर्ग (Water Discharged) सुरू आहे. आता पावसाचा जोर वढणार असल्याचा अंदाज हवाामान खात्याने (Weather Department) व्यक्त केला आहे.

कालपासून दिवसभर शहरात ढगाळ वतावरण होते. पहाटे पाऊस झाला. अधूनमधून हलक्या सरीं पडल्या. दारणातुन (Darna Dam) आज १५० क्युसेक्स पाणी सोडले. नांदुरमध्यमेश्वरमधून ४००, भावली धरणातून ७३, वालदेवीतून ६५, हरणबारीतून ६० क्युसेस पाणी सोडले आहे. वालदेवी, भावली १०० टक्के, नांदुरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwer) ९६ टक्के भरले आहे. गिरणामध्ये ४० टक्के जलसाठा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या