Friday, May 3, 2024
Homeजळगावहद्दपारीबाबतची दाखल याचिका अनिल चौधरींनी घेतली मागे

हद्दपारीबाबतची दाखल याचिका अनिल चौधरींनी घेतली मागे

भुसावळ Bhusaval। प्रतिनिधी

येथिल माजी प्रभारी नगराध्यक्ष Anil Chaudhary यांना पोलिस प्रशासनातर्फे बजावण्यात आलेल्या हद्दपारीच्या deportation नोटीसविरुद्ध उच्च न्यायालयातHigh Court दाखल केलेली याचिका Petition परत घेतली आहे. यापूर्वी हद्दपारीची शिक्षा आपण भोगली आहे. त्यामुळे याबाबत संबंधिताननी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिली.

- Advertisement -

भुसावळ शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून गुन्हेगारांच्या टोळ्या हद्दपार करण्याची कारवाई सुरू केली आहे. यात माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांना सुद्धा हद्दपारीची नोटीस प्रशासनाने दिली होती. त्याविरुद्ध अनिल चौधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेच्या खुलासासंदर्भात प्रशासनाने न्यायालयात अहवाल दाखल केला होता. त्यानंतर अनिल चौधरी यांनी सदरची याचिका परत घेतली आणि प्रशासनाने यावर लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती चौधरी यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने सदर हद्दपारच्या कारवाईवरील सुनवाई तातडीने पूर्ण करावी. तसेच त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असे कोर्टाला देखील अपेक्षित असल्याचे म्हटले आहेे. त्यामुळे आता अनिल चौधरी यांच्या हद्दपारीच्या कारवाईचे कामकाज प्रशासनाला लवकर चालवावे लागणार असून त्यावर लवकर निर्णय द्यावा लागणार आहे.

यापूर्वी आपण हद्दपारीची शिक्षा भोगली आहे. मागील अनेक वर्षांपासून आपल्याला याबाबत वारंवार नोटीस बाजवण्यात येत आहे. हा आपल्यावर अन्याय होत असल्यामुळे न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती परत घेतली असून संबंधितांनी याबाबत काय तो निर्णय एकचाद द्यावा अशी मागीण न्यायालयाकडेकरुन याचिका मागे घेतली आहे. निवडणुकांच्या तोंडावर आपल्याला याबाबत नोटीसा बजावण्यात येतात. आपला न्यायालयावर विश्वास आहे.

– अनिल चौधरी

माजी प्र. नगराध्यक्ष, भुसावळ.

- Advertisment -

ताज्या बातम्या