Monday, May 6, 2024
Homeनाशिकसिन्नर ठरतोय करोनाचा हॉटस्पॉट; २४ तासात आढळले 'इतके' बाधित

सिन्नर ठरतोय करोनाचा हॉटस्पॉट; २४ तासात आढळले ‘इतके’ बाधित

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या २४ तासांत ग्रामीण भागात करोनाचे एकूण ८६ रुग्ण आढळून आले असून यामध्ये एकट्या सिन्नर तालुक्याचे ६१ बाधित आहे. यामुळे सिन्नर पुन्हा एकदा करोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. यामुळे पुन्हा करोना बाधित वाढतात का याबाबत चर्चांना उधाण आले आहे….

- Advertisement -

शहरात करोनाबाधितांची संख्या २४ तासात ३० असून ग्रामीण भागात ८६ नागरिक बाधित झाले आहेत. सध्या जिल्ह्यात १ हजार ८ नागरिक उपचार घेत आहेत.

गेल्या २४ तासात एकूण ११८ रुग्ण बाधित झाले तर १०३ रुग्णांनी करोनावर मात केलेली आहे. शहरात ३०, ग्रामीण भागात ८६, तर मालेगाव आणि जिल्हा बाह्य प्रत्येकी १ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ४ हजार ६०४ रुग्ण बाधित तर ३ लाख ९५ हजार ०३७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज जिल्ह्यात १ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा मनपा कार्यक्षेत्रातील आहेत. ग्रामीण आणि मालेगाव कार्यक्षेत्रात एकही रुग्ण दगावला नसून एकूण बळींची संख्या ८ हजार ५५९ इतकी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या