Friday, May 3, 2024
Homeराजकीयहिंदू सणांना विरोध का? दहीहंडी करणारच; राम कदम यांचा इशारा

हिंदू सणांना विरोध का? दहीहंडी करणारच; राम कदम यांचा इशारा

मुंबई | Mumbai

मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी हिंदू सणांना विरोध का? असा सवाल करात दहीहंडी साजरी करणारच असा इशारा दिला आहे.

- Advertisement -

राम कदम यांनी म्हटले आहे की, ‘काही गोविंदा पथक महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदा तरी दहीहंडीचा उत्सव साजरा करता यावा, अशी सर्व गोविंदा पथकांची मागणी होती. यावर्षीची दहीहंडी महाराष्ट्राच्या हिंदूविरोधी सरकारने कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. दहीहंडी हा हिंदूंचा सण आहे. जेव्हा हिंदूंचे सण येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले आणि इतरांचे सण येतात तेव्हा त्यांना परवानगी. हा दुटप्पी न्याय कसा?. बियर बार, दारुचे ठेके उघडताना त्यांना प्रोटोकॉल लावता. तसे जर नियम तुम्ही लावणार असला तर त्याचं आम्ही स्वागत करु, पालन करु, पण तुम्ही नियम लावणार नसाल आणि एअर कंडिशनर बंगल्यामधून सांगणार असला दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाहीत. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच.’

- Advertisment -

ताज्या बातम्या