Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याआज ज्येष्ठा गौरींचे आगमन

आज ज्येष्ठा गौरींचे आगमन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गणेशोत्सवाच्या काळात चौथ्या दिवशी म्हणजे आज ज्येष्ठां गौरींचे आगमन होत आहे. आजपासून तीन दिवस महालक्ष्मीचा उत्सव घरोघरी साजरा होणार आहे. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते.

- Advertisement -

गौरीला माहेरवाशीण म्हटले जाते. गौरीच्या रुपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते. गौरी आल्यानंंतर ती 2 दिवस पाहुणचार घेते. अनुराधा नक्षत्रावर गौरींचें आगमन झाल्यावर दुसर्‍या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर सोमवारी गौरींचें पूजन होणार आहें. गौरी पूजनाची पद्धत, कुळाचारा प्रमाणे वेगवेगळी असते. तिसर्‍या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन होणार आहे.

महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या, फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. नाशिक जिल्ह्यात बहुतांशी मुखवटे सजवुन पुजले जातात. सोमवारच्या पुजनाला सर्वाधीक महत्व आहे. ज्येष्ठा गौरींना रविवारी घरी तुळशी वृंदावनाजवळून सवाद्य आणले जाईल. लक्ष्मीप्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवले जातील. त्यानंतर त्यांना स्थानापन्न केलें जाईल. त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जाईले.

सोमवारी महालक्ष्मीचें मनोभावे पूजन करुन सायकाळी महाप्रसाद वाटला जाईल. 16 भाज्या, खीर, गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवीला जाईल. शिवाय लाडू, चकल्या, करंजी असे विविध प्रकारचे फराळ, फळ यांचाही नैवेद्य दाखवण्यात येणार आहे.

महालक्ष्मी आगामननामुळे बाजारात फुले, फुले, पत्री बराबेरच फराळांंच्या पदार्थांना चांगली मागणी वाढली आहे. उद्यापासून दोन दिवस गणपती बरोबरच महलक्ष्मीच्या आगमनामुळे चैतन्याला चांगलाच बहर येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या