Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्याGujarat New CM : कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री?; 'ही' नावे आघाडीवर!

Gujarat New CM : कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री?; ‘ही’ नावे आघाडीवर!

दिल्ली | Delhi

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी (Vijay Rupani) यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना रूपानी यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्रीपदी कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. (Next Gujarat CM)

- Advertisement -

गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक होत आहे. या बैठकीत भाजपचा नेता म्हणजेच मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. गुजराच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्री मनसुख भाई मांडविया, गुजरात प्रदेश भाजपाध्यक्ष सीआर पाटील, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि लक्षद्वीप लेफ्टनंट राज्यपाल प्रफुल्ल खोडभाई पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, या पदासाठी मनसुख मांडविया यांची निवड होण्याची अधिक शक्यता आहे.

राजीनाम्यानंतर काय म्हणाले रूपानी?

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रूपाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पक्षातील जबाबदाऱ्या काळानुसार बदलतात. पक्षात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे, असे विजय रूपाणी यांनी म्हटले आहे. तसेच “जेपी नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी देखील अभूतपूर्व आहे. यानंतर मला जी जबाबदारी मिळेल, ती मी पार पाडेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या