Friday, May 3, 2024
Homeनाशिकअपूर्वाने साकारली राष्ट्रप्रेमाची आरास

अपूर्वाने साकारली राष्ट्रप्रेमाची आरास

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येथील लोकमान्यनगर Lokmanyanagar परिसरातील रहिवासी अपूर्वा वीणा विजय दांडेकर Veena Dandekar या युवतीने यंदाच्या गणेशोत्सवात Ganesh Festival घरी सुंदर आरास केली आहे.‘राष्ट्रध्वजाचा परिवर्तनीय प्रवास’ The variable journey of the national flag या संकल्पनेवर आधारित सजावटीद्वारे तिने राष्ट्रप्रेमाचा व पर्यावरणरक्षण, संवर्धनाचा संदेश दिला आहे. 1906 पासून 1947 पर्यंत राष्ट्रध्वजात कसकसे बदल होत गेले हे तिने साकारले असून ही सजावट बघण्यासाठी अनेकजण तिच्या घरी दर्शनाला येत आहेत.

- Advertisement -

यंदा भारतीय स्वातंत्र्याने 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाची संकल्पना अपूर्वाने गणरायाच्या सजावटीत वापरली. 1906 साली पहिला राष्ट्रध्वज बनविण्यात आला होता. तेव्हापासून 1917, 1921, 1931 या वर्षी त्याचे स्वरूप बदलले. 1947 साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा स्वतंत्र भारताचे गौरवशाली प्रतीक असणारा तिरंगा फडकविण्यात आला. हा प्रवास अपूर्वाने सुंदर पध्दतीने रेखाटला असून अभ्यासपूर्वक ध्वज तयार करून लावले आहेत.

मध्यभागी स्वतः शाडूमातीची तयार केलेली व नैसर्गिक जलरंगांचा वापर करून रंगवलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्तीदेखील बांबूच्या टोपलीवर विराजमान झालेली दिसते. बाजूला आरोग्यासाठी उपयुक्त अशी आयुर्वेदिक हळदीची रोपे लावण्यात आली आहेत. पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैलीत निसर्ग रेखाटला आहे. त्यातून पर्यावरण रक्षण व निसर्गप्रेमाचा संदेश दिलेला दिसतो. ही संपूर्ण आगळीवेगळी आरास अपूर्वाने कोणाचीही मदत न घेता स्वतःच्या कल्पनेने व पूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून साकारली आहे.

‘बदलते नाशिक’ संकल्पनेवर सजावट स्पर्धा

नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक 20 मधील गणेशभक्त नागरिकांसाठी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बदलते नाशिक’ या संकल्पनेवर आधारित ही आकर्षक सजावट स्पर्धा उत्तुंग झेप फाउंडेशन, हॅशटॅग चिपको आंदोलन यांच्या माध्यमातून होत असल्याचे संयोजक रोहन देशपांडे यांनी सांगितले.

नागरिकांनी आपल्या घरी केलेल्या गणपती व महालक्ष्मी सजावटीत शाडूमातीच्या गणेशमूर्तीची स्थापना केलेली असली पाहिजे. आरास करतांना प्लास्टिक, थर्माकोल यांचा वापर नको. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नैसर्गिक साहित्य वापरून सजावट केलेली असली पाहिजे. अशा सजावटीचा फोटो व व्हीडीओ दि. 17 ऑक्टोबर 2021 पर्यंत पाठवावा. उत्कृष्ट सजावटींची निवड करून त्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या