Sunday, May 19, 2024
Homeजळगावगिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चित्रकार दाभाडे यांची नोंद

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चित्रकार दाभाडे यांची नोंद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

इंदोर (Indore) येथील रडार संस्थेमार्फत (Radar Institute) लॉकडाऊनमधील कोरोनामहामारीच्या काळात सुट्टीचा सदुपयोग व्हावा म्हणून पूर्ण जगातील 112 देशामधील नामवंत कलाकारांना फेसबुकच्या(Facebook) माध्यमातून एकत्रित करुन एकूण 1 हजार 149 चित्रकारांनी पेटींग (Painting) साकारले. ही चित्रे एका तासात फेसबुकवर अपलोड करावयाचे होते. त्यात जळगांवातील मानव सेवा विद्यालयातील(School of Human Services) कलाशिक्षक,(Art teacher) उपक्रमशील शिक्षक सुनील न्हानू दाभाडे (Sunil Nhanu Dabhade) व ललवाणी कॉलेजचे (Lalvani College) कलाशिक्षक चंद्रकांत कोळी (Chandrakant Koli) कलावंताचा यात सहभाग होता. या दोघांच्या चित्रांची निवड थेट गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Guinness World Book of Records) नोंद झाली आहे. हा खान्देशातील जळगांव जिल्हाचासह महाराष्ट्राचा गौरव आहे. या दोघांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून बहुप्रतीक्षित प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक मिळाले आहे.

- Advertisement -

चित्रकार सुनील दाभाडे यांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र व सुवर्ण पदक मिळाल्याने संस्थेचे अध्यक्ष डॉ आर.एस.डाकलिया यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी व सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. दरम्यान, चित्रकार सुनिल दाभाडे यांनी या आधी सुध्दा ज्वारीच्या भाकरीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त पेटींग काढली होती.

ती पेटींग जगातील पहिली पेटींग ठरली आहे. यांची जचॠ छढखजछङ इजजघ जऋ ठएउजठऊड मध्ये नोंद घेण्यात आली आहे. सुनिल दाभाडे हा अवलिया शिक्षक आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात चौकाचौकात जाऊन स्वखर्चाने रस्त्यावर चित्र काढून जनजागृती केली आहे. तसेच अनेक ठिकाणी घोषवाक्य ही लिहिले आहे.

चित्रकार दाभाडे यांच्या चित्राचे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल त्यांचा माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेटकर, दिगंबर कट्यारे, विद्यानिकेतन प्राचार्य यशवंतराव मोरे, चित्रकार प्रेमकुमार सपकाळे, चित्रकार सचिन मुसळे, शाम कुमावत, निरंजन शेलार,अविनाश मोघे, मनोज जंजाळकर, उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे, जनमतचे अध्यक्ष पंकज नाले, आ.पा.महासंघाचे संस्थापक आप्पासाहेब साळुंखे, रा.ना.सोनवणे, मुकेश साळुंखे, दिपक खांदे, उखर्डू साळुंखे,पंडितराव सोनवणे, सुकदेव मावळे, बाबुलाल खांदे, अनिल चव्हाण, विजय चव्हाण, विजय पवार, सागर पारधी, देविदास सोनवणे, अक्षय आढारे, दिपक पवार (दिल्ली), प्रेमकुमार मावळे, संदेश मावळे, आदित्य चव्हाण, संदीप पवार, मनोज बावस्कर, गिरीश जाधव, दिनेश बाविस्कर, विकास चौधरी यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या