Sunday, May 5, 2024
Homeनगरबाजार समितीच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिल्यास उपोषण

बाजार समितीच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिल्यास उपोषण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला कारणे दाखवा नोटीसीला उत्तर देण्यासाठी आणखी मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी नगर तालुका महाआघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना निवेदन देण्यात आले आहे. मुदतवाढ दिल्यास 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपोषण आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

- Advertisement -

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, संपत म्हस्के, बाळासाहेब गुंजाळ, गोविंद मोकाटे, राजेंद्र भगत, संदीप गुंड, डॉ. दिलीप पवार, रामदास भोर ,प्रवीण कोकाटे, विठ्ठलराव काळे गुलाब शिंदे, रवींद्र भापकर ,पोपट निमसे, प्रवीण गोरे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला 8 सप्टेंबर रोजी 12 मुद्द्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना दिनांक 20 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यानंतर त्यांना पुन्हा दोन-तीन वेळा मुदत वाढ देण्यात आली. त्यांना म्हणणे मांडण्यास मुदतवाढ दिल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार सुरू झाला आहे. बाजार समितीच्या आवारातील भूखंडांचे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर करारनामे करीत आहेत. बेकायदेशीरपणे बिगर शेती प्लॅन पुन्हा करणे व सुस्थितीतील इमारती पाडण्यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत.

त्याचप्रमाणे कर्मचारी बढती, सातवा वेतन आयोग व इतर काही आर्थिक बाबी अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहेत. त्यांना पुन्हा म्हणणे मांडण्यास अजिबात मुदतवाढ देऊ नये. इतर करार नामे व धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रतिबंध करावा. त्यांना पुन्हा मुदतवाढ दिल्यास बुधवार (दि.13) जिल्हा उपनिबंधक कार्यालयमध्ये उपोषण करण्यात येईल. याबाबत कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहिल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या