Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक विभागाला 59 कोटी 36 लाख रुपये

नाशिक विभागाला 59 कोटी 36 लाख रुपये

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात गेल्या मार्च ते मे दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपीटीने शेतीचे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना राज्य शासनाने 122 कोटी रुपयांची मदत दिली आहे. यामध्ये नाशिक विभागाला ५९ कोटी ३६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत….

- Advertisement -

अवकाळी पाऊस गारपिटीनेे नकसान झाल्यानतर सर्व विभागीय आयुक्तांनी आपपाल्या विभागाचा आढावा शासनाला सादर केला होता. त्यानंतर मंत्रीमंडंळाने निधी मंजुर करुन तो पाठवला आहे. त्यात नाशिक विभागाला 59 कोटी रुपये प्राप्त झाले.

नाशिक जिल्ह्यासाठी 11 कोटी 67 लाख, धुळ्यासठी 2 कोटी 26 लाख, जळगावला 35 कोटी 35 लाख, नगरसाठी दहा कोटी सहा लाख रुपये मंजुर झाले आहेत. लवकरच ती रक्कम संबंधीत नुकसान ग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार आहे.

उद्या आढावा बैठक

दरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या अतीवृष्टीने जिल्ह्यात 35 हजार हेक्टर वरील पिकांचे आतोनात नुकसान झाले. 48 हजार शेतकर्‍यांना त्याचा थेट फटका बसला. त्यानंतर शासनाने तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले होते. त्या सर्व नुकसानीचा आढावा शुक्रवारी (ता. 8) सकाळी अकराला पालकमंत्री छगन भुजबळ हे जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आहे. त्यानंंतर ते कोरोना सद्य स्थितीचा आढावा घेऊन मुंबईला रवाना होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या