Sunday, May 5, 2024
Homeनाशिकशाळा सुरु बस बंद, मग शाळेत जाऊ तरी कसं?

शाळा सुरु बस बंद, मग शाळेत जाऊ तरी कसं?

ओझे | वार्ताहर | Oze

महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) दि. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु (Schools Reopen) करण्यास परवानगी दिल्यानंतर ग्रामीण भागातील (Rural Area) पालकांसह विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे…

- Advertisement -

शाळा सुरु झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. विशेष म्हणजे तब्बल दोन वर्षांनी शिक्षकांना (Teachers) गुरुजी, सर हे शब्द ऐकण्यास मिळाले. त्यामुळे अनेक शिक्षक भारावून गेल्याचे दिसून आले. मात्र ग्रामीण भागात बस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात विरजण पडले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी दिंडोरी (Dindori) येथे तालुक्याच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालयात जातात. शाळा सुरु होऊन पाच ते सहा दिवस झाले आहे तरी ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बसचे दर्शन झालेले नाही.

काही ठिकाणी आदिवासी विकासच्या बस चालू झाल्या आहेत. बस एकाच वेळेस येत असल्याने विद्यार्थ्यांना बस शाळेपर्यंत घेवून तर जाते पण शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था नाही. काही विद्यार्थ्यांना जाताना बस आहे तर येण्यासाठी नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा सुरु होऊनदेखील घरीच थांबावे लागत आहे.

करोनाचा (Corona) संसर्ग वाढल्यापासून ग्रामीण भागातील खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्याचप्रमाणे बसदेखील बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या