Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto नाशिकमध्ये मुसळधार, रस्ते पाण्यात

Photo नाशिकमध्ये मुसळधार, रस्ते पाण्यात

नाशिक शहर (nashik)व जिल्ह्यात काही भागात आज मुसळधार पाऊस झाला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये विजांच्या गडगडटासह जोरदार पावसाला (heavy rain)सुरुवात झाली. ऑक्टोंबर हिटचा (october)अनुभव येत असतांना दुपारी अचानक आभाळ भरून आले आणि जोरदार पाऊस सुरु झाला.

दुपारी ४ वाजता वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण तयार झाले. विजांचा कडकडाट सुरु झाला. शहरावर दुपारी ढग दाटून आले आणि काळोख झाला. त्यानंतर पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. इंदिरानगर, देवळालीगाव, पंचवटी, नाशिकरोड, सिडको परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.

- Advertisement -

तासभर झालेल्या या पावसामुळे रस्ते पाण्यात गेले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्वच रस्त्यांवर पाणी साचले.

- Advertisment -

ताज्या बातम्या