Friday, May 3, 2024
Homeनाशिकतीर्थक्षेत्र विकास परिसराला उपयोगी

तीर्थक्षेत्र विकास परिसराला उपयोगी

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

तीर्थस्थळांचा विकास होणे, हा त्या परिसरातील गावांना लाभदायी ठरतो, भाविक हाच केंद्रबिंदू मानून त्र्यंबकेश्वर Trimbakeshwar देवस्थानकडून परिसर विकास व्हावा, लोकोपयोगी उपक्रम देवस्थानने राबवावे, असे प्रतिपादन नाशिकचे मुख्य न्यायाधीश अभय वाघवसे Nashik Chief Justice Abhay Waghavase यांनी केले.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजा परिसरात भाविकांना बारीसाठी नूतन दर्शन मंडप Darshan Mandap उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी न्यायाधीश वाघवसे बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतअधिकारी तेजस चव्हाण, नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.

भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून या कामासाठी ट्रस्टला परवानगी मिळाली आहे. मूळ मंदिराचे सौंदर्य वाढेल असे काम होणे अपेक्षित आहे. त्रंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी येत्या चार महिन्यांत दर्शनबारी साठी 2 दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी त्रंबकेश्वर देवस्थानचे आजी-माजी विश्वस्त येथील मान्यवर उपस्थित होते. पूजा पौरोहित्य लोकेश शास्त्री अकोलकर, दिलीप रुईकर यांनी केले. मंदिराचे विश्वस्त प्रशांत गायधनी, तृप्ती धारणे, दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, संतोष कदम, भूषण अडसरे पंंकज भुतडा आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या