Friday, May 3, 2024
Homeधुळेसंपकर्‍यांची गांधीगिरी, आगार केले चकाचक

संपकर्‍यांची गांधीगिरी, आगार केले चकाचक

धुळे Dhule । प्रतिनिधी

एसटी कर्मचार्‍यांचा (ST employees) संप (Strike) आठव्या दिवशीही सुरु असून धुळे आगारातून एकही बस धावली नाही. तर संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांनी गांधीगिरी करीत स्वच्छता मोहिम (Sanitation campaign) राबवून धुळे आगार स्वच्छ (Dhule depot clean) केले. आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

- Advertisement -

एसटी कर्मचार्‍यांचा समावेश शासनात करण्यात यावा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी दि. 7 नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. या संपात चालक, वाहक, सफाई कामगार सहभागी झाले आहेत. यामुळे आगारात सन्नाटा दिसून येत आहे. कर्मचार्‍यांच्य संपामुळे एकही बस धावत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

आंदोलनकर्त्यार्ंंनी आज गांधीगिरी करत धुळे आगारात स्वच्छता मोहिम राबविली. संपुर्ण आगार स्वच्छ केले व आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

गेल्या आठ दिवसांपासून संप सुरु असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी वाहनचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन प्रवाशांची लूट करीत आहेत. कर्मचार्‍यांच्या संपामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून कर्मचार्‍यांना रोजंदारीचे काम करण्याची वेळ आली आहे.

आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा व्यक्त करुन आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला. याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांनी आपल्या न्याय व हक्कासाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच एसटी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ येवून नये यासाठी शासनाने आंदोलन थांबवावे असे पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, सचिव निंबा पाटील, कार्याध्यक्ष प्रदीप जाधव, विरेंद्र मोरे, डॉ. संजय पाटील, साहेबराव देसाई, वाय. आर. मंडाले, आबासाहेब कदम, नानासाहेब कदम, अर्जुन पाटील, रवींद्र शिंदे, विनोद जगताप, नैनेश साळुंखे, संदीप पाटील, संदीप पाटोळे, देविदास पवार, लहू पाटील, प्रा. बी.ए.पाटील आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या