Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपुरात चिकनगुणिया व गोचिड तापाचे रुग्ण वाढले

श्रीरामपुरात चिकनगुणिया व गोचिड तापाचे रुग्ण वाढले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

डासांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील विविध भागात चिकन गुणीया व गोचिड तापाचे रुग्ण मोठयाप्रमाणात वाढले आहेत. या आजारामुळे अनेक रुग्ण मोठ्या हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने शहरात तातडीने फवारणी सुरू करावी, अशी मागणी सुरेश कांगुणे यांनी केली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून डासांची फवारणी केली नसल्यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .त्यामुळे शहरातील विविध भागांतील नागरिक चिकनगुणिया व गोचीड तापामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या संदर्भात नगरपरिषदेने विविध हॉस्पिटलमधील रुग्ण अहवाल तपासणी करून तातडीने औषध फवारणी सुरू करणे गरजेचे आहे .करोनानंतर विविध साथीचे आजार श्रीरामपूर शहरात वाढत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत लक्ष घालून स्वच्छतेकडे आणि डास निर्मूलनासाठी मोहीम हाती घेणे गरजेचे असल्याचे श्री.कांगुणे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या