Friday, May 3, 2024
Homeराजकीयपडळकर आणि खोत एसटी आंदोलनात तेल ओतण्याचे काम करत आहेत - अब्दुल...

पडळकर आणि खोत एसटी आंदोलनात तेल ओतण्याचे काम करत आहेत – अब्दुल सत्तार

पुणे |प्रतिनिधि| Pune

एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यात मध्यस्थी व्हायला पाहिजे आणि त्यातून तोडगा निघायला हवा. राजकीय लोकांनी यात ढवळाढवळ करू नये. आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे या आंदोलनात तेल ओतण्याचे काम करत आहेत असा आरोप करत त्यांचे सरकार असताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात का विलीनीकरण केले नाही, असा सवाल राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

- Advertisement -

खरं म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांनी जो बंद पुकारला आहे, याचा फटका ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे एसटी सुरू व्हायला पाहिजे. एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यात मध्यस्थी व्हायला पाहिजे आणि त्यातून तोडगा निघायला हवा. राजकीय लोकांनी यात ढवळाढवळ करू नये. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे या आंदोलनात तेल ओतण्याचं काम करत आहेत. त्यांचे सरकार असताना त्यांनी एसटीचे विलीनीकरण का केले नाही असा सवालही सत्तार यांनी उपस्थित केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांशी मी सहमत असून यात मार्ग काढून मध्यस्थी करायला पाहिजे असे सत्तार म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ते जोपर्यंत येत नाहीत आणि कॅबिनेटची बैठक होत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा सुटणार नाही. तसेच हे एक महामंडळ नसून सर्वच महामंडळाचा विचार करावा लागणार आहे.”, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीला आज २ वर्ष पूर्ण झाली. त्या घटनेवर राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, “थोडा खेळ भाजपाने अजित पवार यांच्याबरोबर खेळला होता पण शरद पवार यांनी तो खेळ २४ तासाच्या आत हाणून पाडला. राजकीय खेळ कसा खेळावा, हे अजित पवार आणि शरद पवार यांना माहिती आहे.”

पीक विमा कंपन्यांवर कडक कारवाई करायला हवी

पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांचे रक्त पित आहे. त्याविरोधात राज्य आणि केंद्र सरकारने कडक कारवाई करायला पाहिजे. पीक विमा कंपनी ज्या पद्धतीने नुकसान भरपाईच्या वेळेला कारभार करत आहे, त्याचा मी देखील निषेध करतो. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नियमांप्रमाणे मदत केली पाहिजे. 75 टक्के रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. ज्यांना मदत नाही मिळाली आहे त्यां शेतकऱ्यांनी चुकीची महिती दिली असेल. त्यांनी ती माहिती जिल्हाधिकारी यांना द्यावी. त्यांनाही मदत केली जाईल असंही सत्तार म्हणाले.

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण व्हावं हे सगळयांनाच वाटत आहे. पण सुप्रीम कोर्टाने यात काही निर्णय दिला आहे. याचा अपमान होणार नाही याची दक्षता घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याची अंमलबजावणी करतील असंही सत्तार म्हणाले.

दरम्यान, भाजपकडून अमरावती, नांदेड, मलेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत बिनबुडाचे आरोप केले जात आहे. ज्यांनी तोडफोड केली आहे, ते मग रझा अकादमी असो की भाजप पुरस्कृत संघटना असो, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कारवाई ही होणार आहे. ज्यांनी ज्यांनी चुका केल्या आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जे कायदा-सुव्यवस्था बिघडवतील त्यांच्यावर कायदेशीर आणि कडक कारवाई करण्यात येईल. मग ती कोणतीही संघटना असो. यात जात, धर्म बघितला जाणार नाही असंही सत्तार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या