Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापवार साहेबांनी पर्याय काढला आता तुटेपर्यंत ताणू नका

पवार साहेबांनी पर्याय काढला आता तुटेपर्यंत ताणू नका

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पूर्वीचे राजकारणी (Politician) एकमेकांचे आदर करायचे, तसेच राजकारण्यांमध्ये नम्रता होती. अलीकडचे पुढारी साधा नमस्कारदेखील करत नाहीत. या पुढाऱ्यांच्या बापाचे काय जाते तेच समजत नाही. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सध्याच्या राजकीय संस्कृतीवर टीका केली…

- Advertisement -

आज उपमुख्यमंत्री अजित पवार कळवण दौऱ्यावर आहेत. कळवण (Kalvan) येथील कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. सध्या कोण काय काय बोलत आहे. ही काय महाराष्ट्रची संस्कृती आहे का? पूर्वी राजकारण्यांमध्ये नम्रता होती. अलीकडचे पुढारी नमस्कारदेखील करत नाही, काय त्यांच्या बापाचे जाते कळत नाही. कोणीही तांब्रपत्र घेऊन येत नाही. आपण जमिनीवर राहिले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

ते पुढे म्हणाले की, करोनाच्या नवीन विषाणूचा प्रसार होत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून विमान येऊ नये यासाठी सरकारने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. या विषाणूवर लस अद्याप उपलब्ध नाही. हा वेगाने पसरणारा विषाणू आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत बैठक घेतली आहे. मुख्यमंत्रीदेखील यावर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनीदेखील खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

संपकऱ्यांनी विचार करावा

करोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यानंतर अवकाळी पाऊस आणि चक्रिवादळामुळे प्रचंड नुकसान झाले. नंतर एसटीचा संप (ST Strike) सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब व माझी बैठक झाली. पवार साहेबांनी अनुभवानुसार योग्य पर्याय काढला आहे. संपकऱ्यांनी आता तुटेपर्यंत ताणू नये. ही गोरगरिबांची एसटी आहे. येत्या 1 डिसेंबरपासून मुलांच्या शाळा सुरू होत आहेत. त्याचादेखील विचार करावा. तुम्हीदेखील महाराष्ट्रातीलच आहात, असे पवार म्हणाले.

आम्हाला आमचे काम करू द्या

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकार कोसळणार असल्याचे भाष्य केले त्यावर अजित पवार म्हणाले की, सरकार पडणार असे आठवले किती वेळा म्हणाले? ते अनेकदा हेच सांगतात. आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून असेच विधान सुरु आहेत. बोलणाऱ्यांना बोलू द्या. आम्हाला आमचे काम करू द्या. 145 ची मॅजिक फिगर पाठिशी असेपर्यंत त्या सरकारला काहीही अडचण नसते एवढंच मला माहीत आहे, असंही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या