Wednesday, May 15, 2024
Homeनाशिकसंमेलनाच्या ग्रंथदिंडीत रिंगण

संमेलनाच्या ग्रंथदिंडीत रिंगण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा 94th Marathi Literary Convention प्रारंभ ग्रंथदिंडीने Granthdindi होणार आहे. वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानदंड मानला जातो.

- Advertisement -

आषाढी-कार्तिकीला वारीत डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा साजरा होतो. साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू आहे. या सोहळ्यात ग्रंथदिंडी निघणार आहे. मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक ही साहित्य संमेलनाची पुस्तकपंढरी ठरणार आहे.

या दिंडीत सहभागी होणारे बालवारकरी रिंगण करणार आहेत. त्याची तयारी शाळा-शाळांमधून झाली आहे. विनायक रानडे, संतोष हुदलीकर, गीता बागुल, मंगेश बिरारी यांनी या कामात झोकून दिले आहे. त्यामुळे शुभारंभाचा कार्यक्रम दिमाखदार होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या