Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रशाळा सुरु करण्याच्या निर्णयाचे फेरविचाराचे संकेत

शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचे फेरविचाराचे संकेत

ओमायक्रॉनच्या संकटामुळं आता एक डिसेंबरपासून सुरु झालेल्या शाळांवर पुन्हा एकदा गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने पुन्हा शाळा बंद होण्यासंदर्भात संकेत दिले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांबाबत 4 ते 5 दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळत आहे.

मालेगावातील घटनेने सलमान खान नाराज, म्हणाला…

- Advertisement -

वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे की, स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई, पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळांची नियमावली बनवली आहे. इथुन पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र लहान मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण सुरु व्हावं अशी आमची अपेक्षा असल्याचं मतही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या