Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यासाहित्य संमेलनातील 'ते' तिघे करोना निगेटिव्ह

साहित्य संमेलनातील ‘ते’ तिघे करोना निगेटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहराच्या वेशीवर काल झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) प्रवेशद्वारावर ३ करोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले होते.

- Advertisement -

आज त्यांची आरटीपीसीआर (RTPCR) केली असता ती निगेटिव्ह (Negative) आली असल्याची माहिती संमेलनाचे आरोग्य समिती प्रमुख डॉ. प्रशांत भुतडा (Dr. Prashant Bhutada) यांनी दिली आहे. त्यामुळे आरोग्य समितीच्या कार्यामुळे संमेलनावर करोनाचे (Corona) आलेले संकट थोपवण्यात समितीला यश आले आहे…

जगभरात गेल्या दोन वर्षांपासून करोना विषाणूने थैमान घातले आहे. सगळीकडे लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला होता. जागतिक स्तरावर अनेक संशोधक हे संकट थोपविण्यासाठी प्रयत्न करत होते.

लसीकरण (Vaccination) झाल्यानंतरदेखील सगळीकडे भयावह वातावरण होते. मात्र लसीकरण चांगले झाले; त्यानंतर करोनाची धार कमी कमी होऊ लागली. त्यामुळे सगळीकडे जनजीवन सुरळीत झाले. राज्यात देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. ९३ वे संमेलन उस्मानाबादमध्ये झाल्यानंतर ९४ वे नाशिकमध्ये होणार असल्याबाबत निर्णय झाला होता; मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले होते.

दुसऱ्या लाटेचा प्रकोप कमी झाला; जिल्ह्यात चांगले लसीकरण झाले त्यामुळे नागरिकांमधील भीतीची जागा विश्वासाने घेतली होती. साहित्य संमेलन होण्याबाबतदेखील अनेक चर्चा बैठका झाल्या. मात्र संमेलनाच्या ४ दिवस अगोदर ओमायक्रॉन नावाचा करोना विषाणूचा नवा व्हेरीएंट समोर आला. त्यामुळे राज्य शासनाच्या टास्क फोर्सने आवश्यक त्या सूचना विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी साहित्य संमेलनाबाबत महापालिका आयुक्त, आरोग्य प्रशासन आणि संमेलनाचे पदाधिकारी यांना सूचना दिल्या.

संमेलनाचे आरोग्य समिती प्रमुख डॉ. प्रशांत भुतडा यांनी महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत नियोजन आखून त्याचा अवलंब केला. महापालिका आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे तसेच भुजबळ नॉलेज सिटीचे दीपक निकम यांनी संमेलनाच्या पहिल्या दिवशी स्वतः उपस्थित राहून करोना चाचणी आणि लसीकरण याबाबत नियोजन केले.

शहरातील प्रमुख सहा हॉस्पिटल्सने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका अशी रसद पुरविली. महापालिकेच्या वतीने डॉ. गणेश गरुड आणि डॉ. विजय देवकर यांनी संमेलनाच्या तीनही दिवस सेवा बजावली. नामको हॉस्पिटलने ४० तार मातोश्री मेडिकल कॉलेजने ३० असा एकूण ७० चा स्टाफ याठिकाणी कार्यरत होता. ४० डॉक्टर्सची फौज तसेच ३ बूथ आणि एक छोट्या प्रमाणावर बनविलेले हॉस्पिटल असे नियोजन करण्यात आले होते.

साहित्य संमेलन अतिशय सुरळीत पार पडले. करोना विषाणूची धास्ती होतीच पण सर्वांच्या सहकार्याने आपण काळजी घेत संमेलन यशस्वी केले. काल प्रवेशद्वारावर तीन पॉझिटीव्ह आढळले होते ते आता आरटीपीसीआरमध्ये निगेटिव्ह आढळले आहेत.

डॉ. प्रशांत भुतडा, वैद्यकीय समिती प्रमुख, साहित्य संमेलन.

- Advertisment -

ताज्या बातम्या