Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशमतदार ओळखपत्र आधारशी लिंक होणार, जाणून घ्या परिणाम काय होणार?

मतदार ओळखपत्र आधारशी लिंक होणार, जाणून घ्या परिणाम काय होणार?

केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet)निवडणूक सुधारणांसंदर्भात (amendments to the electoral law)महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बुधवारी एका विधेयकाला मंजुरी दिली. मतदार ओळखपत्र (voter ID)आधार कार्डशी (Aadhaar)लिंक करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस मतदान आणि मतदार यादीत डबल नाव येणे रोखले जाणार आहे. नवीन विधेयकानंतर तरुणांना आता वर्षातून चार वेगवेगळ्या तारखांना मतदार म्हणून नावनोंदणीही करता येईल, अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

- Advertisement -

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या विधेयकात सर्व्हिस व्होटर्ससाठी निवडणूक कायद्यांना ‘जंडर न्यूट्रल’देखील बनवण्यात येईल.

सध्या एक जानेवारी ही कट ऑफ डेट असल्याने अनेक तरुण मतदार यादीपासून वंचित राहत होते. उदाहरणच द्यायचे तर, अशा स्थितीत 2 जानेवारीला एखादा तरूण 18 वर्षांचा झाल्यानंतरही त्याला मदार म्हणून नाव नोंदणी करत येत नव्हती. यामुळे त्याला पुढची तारीख येईपर्यंत वाट पाहावी लागत होती. मात्र, आता विधेयकात सुधारणा केल्याने तरुणांना वर्षातून चार वेळा मतदार म्हणून नाव नोंदणी करता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या