Friday, May 3, 2024
Homeक्रीडाएशियन चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा जपानवर दणदणीत विजय

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा जपानवर दणदणीत विजय

ढाका : बांगलादेशात ढाका येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत (Asian Champions Trophy hockey) भारताच्या पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानवर (Pakistan) दणदणीत विजयाची नोंद केली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) आणि आकाशदीप सिंग (Akashdeep Singh) यांच्या गोलच्या बळावर भारताने पाकिस्तानवर ३-१ ने विजय मिळवला होता. त्यानंतर रविवारी झालेल्या सामन्यात विजय घोडदौड भारतीय हॉकी संघाने कायम ठेवली. जपानविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीतही भारताने ६-० असा विजय मिळवला.

रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

- Advertisement -

पाच संघांचा समावेश असलेल्या आणि राऊंड रॉबिन पद्धतीने होत असलेल्या या स्पर्धेत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने सावध सुरुवात केली. परंतु नंतर दिमाखदार कामगिरीसह दोन सलग विजय नोंदवले. सलामीच्या सामन्यात भारताने कोरियाला २-२ असे बरोबरीत रोखले. मग बांगलादेशचा ९-० असा धुव्वा उडवला आणि परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला शुक्रवारी ३-१ असे नामोहरम केले. त्यानंतर जपानचा ६-० असा पराभव करत साखळी सामन्याचा शेवटही गोड केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या