Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रST strike : जाणून घ्या, आज काय झाले उच्च न्यायालयात

ST strike : जाणून घ्या, आज काय झाले उच्च न्यायालयात

मुंबई :

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST employees strike) आज मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) यासंदर्भात सुनावणी झाली. परंतु या सुनावणी दरम्यान कोणताही तोडगा निघाला नाही. पुढील सुनावणी ५ जानेवारी रोजी निश्चित केली आहे. यावेळी कोर्टानं (Mumbai High Court) कर्मचाऱ्यांविरोधात अवमानाची नोटीस काढण्यास नकार दिला. त्यामुळं ही राज्य सरकारला चपराक असल्याचं मानलं जात आहे.

- Advertisement -

रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

कोर्टानं एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी कोर्टाच्या आदेशाच्या अवमानाबाबतची माहिती सर्व २५० डेपोंमध्ये नोटीस लावून माहिती देण्याची सूचना केली. तसेच कोर्टाचे आदेशाची प्रतही लावण्याच्या सूचना केल्या. तसेच कोर्टाच्या आदेशाची प्रत मराठी-हिंदी वृत्तपत्रांमध्येही छापून आणण्याचे आदेश कोर्टानं राज्य शासनाला दिले.

एसटी महामंडळाला आदेश

जे कामगार कामावर येण्यास इच्छूक आहेत, त्यांची वैद्यकीय चाचणी करुन त्याचा अहवाल जमा करुन संबंधित कामगाराला कामावर रुजू करुन घेण्यात यावं. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही कोर्टाने एसटी महामंडळाला दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या