Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामहापालिकेला बससेवेतून 11 कोटी; हे 'सहा मार्ग' ठरले सर्वाधिक फायदेशीर

महापालिकेला बससेवेतून 11 कोटी; हे ‘सहा मार्ग’ ठरले सर्वाधिक फायदेशीर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बहुचर्चित नाशिक महानगरपालिकेची बससेवा (Nashik NMC Bus Service) सुसाट असल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये शहर बस सेवेचा समावेश होता. दि. 8 जुलै 2021 रोजी उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले, तर 2021 वर्षाअखेर सुमारे 11 कोटी रुपयांचा महसूल (Revenue) महापालिकेच्या तिजोरीत आला आहे…

- Advertisement -

बस सेवा तोट्यात सुरू असली तरी महापालिकेच्या माध्यमातून ज्याप्रमाणे शहरवासीयांना इतर सेवा पुरविण्यात येतात त्याचप्रमाणे ही एक सेवा असल्याचा दावा करण्यात येतो. नाशिक महानगरपालिकेची (Nashik NMC) सार्वजनिक वाहतूक शाखा असलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनीने 2021 मध्ये एकूण 11 कोटी 57 लाख 71 हजार 428 रुपये महसूल जमा केला आहे.

महामंडळाने 8 जुलै 2021 रोजी शहर बसेस सुरू केल्या. तेव्हापासून या सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नाशिक शहरात सध्या 148 बस (Bus) रस्त्यावर उतरल्या आहेत. शहरातील 42 मार्गांवर सेवा उपलब्ध करून दिली आहे. टप्प्याटप्प्याने बसची संख्या वाढून एकूण 250 बसेस धावणार आहे. यामध्ये 200 बस सीएनजी (CNG Bus) तर 50 डिझेल बसेस (Diesel Bus) राहणार आहे.

महापालिकेच्या हद्दीतील 42 मार्गांव्यतिरिक्त, महामंडळाच्या हद्दीबाहेरील 12 मार्गांवर, मोहाडी, सुकेना, सय्यद पिंप्री, गिरणारे, जातेगाव, सायखेडा, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, ओझर, लाखलगाव आणि इतर ठिकाणी बसेस धावत आहे. या ठिकाणीदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

निमाणी ते सिम्बॉयसिस कॉलेज, निमाणी ते त्र्यंबकेश्वर, निमाणी ते भगूर, नाशिकरोड ते बारदान फाटा, नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर आणि नाशिकरोड ते ओझर हे सहा मार्ग आजपर्यंत सर्वाधिक फायदेशीर ठरले आहेत.

तपोवन ते उत्तम नगर, निमाणी ते बारदान फाटा, नाशिकरोड ते ओझर (जेलरोड, जत्रा हॉटेल मार्गे), नाशिकरोड ते लाखलगाव आणि नाशिकरोड ते तपोवन (वडाळा, डीजीपीनगर मार्गे) या पाच मार्गांनी २०२१ मध्ये सर्वात कमी कमाई नोंदवली आहे.

एनएमपीएमएलने (NMPML) आजपर्यंत दहा कंडक्टर व 2 चालक यांना कामावरून काढले आहे. प्रवाशांकडून पैसे घेऊनही त्यांना तिकीट न देणे तसेच गाडी चालवताना शोर्टकट व रफ ड्रायव्हिंग करणे आदी कारणांमुळे कारवाई करण्यात आली आहे.

जुलै ते डिसेंबर 21 या कालावधीत 69 हजार 695 एकदिवसीय पास (pass), 459 तीन दिवसांचे पास आणि 166 सात दिवसांचे पास जारी केले आहेत. याच कालावधीत 86 त्रैमासिक आणि 1148 मासिक पास जारी केले. तर ४६८९ विद्यार्थी पासही जारी केले.

सर्वाधिक फायदेशीर मार्ग

(कमाई प्रति किलोमीटर)

  • निमाणी ते सिम्बॉयसिस कॉलेज रु.69.19

  • निमाणी ते त्र्यंबकेश्वर रु. 64.73

  • निमाणी ते भगूर रु.62.44

  • नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर रु.57.42

  • नाशिकरोड ते ओझर रु.57.42

  • नाशिकरोड ते बारदान फाटा रु.50.57

- Advertisment -

ताज्या बातम्या