Monday, May 6, 2024
Homeजळगावकाशिनाथ पलोड पब्लिक स्कुलमध्ये क्रीडा महोत्सवाचा जल्लोष

काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलमध्ये क्रीडा महोत्सवाचा जल्लोष

जळगांव jalgaon

येथील काशीनाथ पलोड पब्लिक स्कुलच्या (Kashinath Palod Public School) क्रीडा महोत्सवाचे (Sports Festival) उदघाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू (International player) उमाकांत राजेश जाधव (Umakant Rajesh Jadhav) यांच्या हस्ते झाले.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुलचे प्राचार्य गणेश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानचे क्रीडा प्रमुख सूर्यकांत पाटील, सौ मंजुषा भिडे व समन्वयीका स्वाती अहिरराव, संगीता तळेले ,अनघा सागडे यांची उपस्थिती होती .

प्रारंभी उमाकांत जाधव यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून ध्वजारोहण केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उमाकांत जाधव व शाळेचे प्राचार्य गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना खेळांची सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले उपस्थित खेळाडूंनी संचलनाद्वारे मानवंदना दिली नंतर खेळाडूंनी आणलेल्या क्रीडाज्योत वरून मुख्य क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.

राष्ट्रीय खेळाडू रोहिणी पवार ,पृथा उपासनी ,अंशू पांडे, मृदुला महाले ,विधी किनगे स्पोर्ट्स कॅप्टन जतीन पाटील या विद्यार्थिनींनी एरियल सिल्क चे प्रात्यक्षिक सादर केले तसेच माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचा मानवी मनोरा तयार केला व प्रत्येक हाऊस नुसार माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी मार्च पास सादर केला.

प्रात्यक्षिकांसाठी सूत्रसंचालन चित्रा पाटील वअमर जंगले यांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी विक्रमाला हिरवी झेंडी दाखवून खेळ सुरू करण्याची अनुमती दिली. याप्रसंगी क्रीडाशिक्षक नरेंद भोई, धीरज जावळे, सिद्धार्थ शिंदे ,संतोष बडगुजर ,शिल्पा मांडे.यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी किनगे तर आभार प्रदर्शन तेजस्वी बाविस्कर यांनी मानले प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिल्पा मांडे यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

- Advertisment -

ताज्या बातम्या