Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यापाच राज्यांच्या निवडणुकांवरून संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले...

पाच राज्यांच्या निवडणुकांवरून संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संपूर्ण तयारीनिशीच निवडणुकांचा (Election) निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुका वेळेत होणे गरजेचे आहे. आयोगाची खात्री पटली आहे की, देशात करोना नष्ट झाला आहे. जाहीर सभांमधून तो वाढणार नाही, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे…

- Advertisement -

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Panjab), मणिपूर (Manipur) आणि गोवा (Goa) या राज्यांचा निवडणूक कार्यक्रम आज राष्ट्रीय निवडणूक आयोगाने (National Election Commission) जाहीर केला. तसेच निवडणुकांसाठी करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर काही नियमावलीदेखील या आयोगाने जाहीर केली आहे. याबाबत त्यांनी निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने जाहीर सभांवर, प्रचारावर, मिरवणुकांवर बंधने घातली आहेत. ती बंधने सर्वांसाठी असावीत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आम्ही ते पाहिले आहे. दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना सर्व राजकीय पक्षांनी त्या लाटेवर आरूढ होऊन कसे प्रचार केले. सत्ताधारी पक्षांनी, पंतप्रधानांनी, प्रमुख नेत्यांनी मोठ्या सभा घेऊ नयेत.

पंतप्रधानांनी तर आदर्श घालून दिला पाहिजे. नियमाचे पालन केले पाहिजे. पंजाबमध्ये जो प्रकार घडला, त्यानंतर आम्हाला त्यांची चिंता वाटते. लोकांचीदेखील करोनामुळे आम्हाला चिंता वाटते, असे राऊत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या