Friday, May 3, 2024
HomeUncategorizedअभाविपचा दावा- MPSC चा आजचा पेपर फुटला, आयोग म्हणाले,...

अभाविपचा दावा- MPSC चा आजचा पेपर फुटला, आयोग म्हणाले,…

राज्य सेवा पूर्व परीक्षाचे आयोजन (mpsc exam)आज करण्यात आले आहे. या परीक्षेचा पेपर नागपूर (Nagpur)केंद्रावर फुटल्याचा दावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) ने केला आहे.

Photo : चंगा लगदा मेनू…म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले साडीतील हटके फोटो

- Advertisement -

अभाविपने म्हटले की, आज सकाळी परीक्षा केंद्रामधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. परीक्षा केंद्रावरील स्टाफने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अभाविपनं संपूर्ण घटना नागपूरचे जिल्हाधिकारी (Collector of Nagpur) तसेच पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. परीक्षा केंद्रासमोर ठिय्या आंदोलनावर बसले.

पेपर फुटलाच नाही – एमपीएससीचे स्पष्टीकरण

राज्यात आज एमपीएससीचा पेपर झाला. काही समाजमाध्यमांमध्ये पेपर फुटल्याची बातमी येत आहे. परंतु, अशाप्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे स्पष्टीकरण एमपीएससीच्या ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या