Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशडॉ. व्ही. अनंत नागेश्वरन देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार

दिल्ली | Delhi

डॉ. व्ही अनंत नागेश्वरन (Dr V Anantha Nageswaran) यांची नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही दिवस अगोदर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

- Advertisement -

Mouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?

अनंत नागेश्वरन हे २०१९ ते २०२१ पर्यंत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य होते. याशिवाय त्यांनी लेखक, शिक्षक, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका निभावल्या आहेत. ते भारतातील प्रसिद्ध बिझनेस स्कूल आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आहेत. सिंगापूरच्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ते शिक्षकही राहिले आहेत.

PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार के व्ही सुब्रमण्यन हे गेल्या वर्षी पदावरून पायउतार झाल्यानंतर सरकारने मुख्य आर्थिक सल्लागारसाठी चार नावांची निवड केली होती. नागेश्वरम व्यतिरिक्त, या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक पामी दुआ आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER)चे महासंचालक पूनम गुप्ता यांचा समावेश होता.

Sonalee Kulkarni : अप्सरेचा अनोखा अंदाज, चाहत्यांना लावले वेड

- Advertisment -

ताज्या बातम्या