Friday, May 3, 2024
Homeजळगाव72 तासांत पार केले एक हजार कि.मी.चे अंतर

72 तासांत पार केले एक हजार कि.मी.चे अंतर

भुसावळ । प्रतिनिधी bhusawal

स्पोर्ट्स अँड रनर्स (Sports and runners) असोसिएशनच्या विजय फिरके (Vijay Firke) यांनी बडोदा सायकल क्लब (Baroda Cycle Club) आयोजित 1000 कि.मी. सायकलिंग स्पर्धेमध्ये यश संपादन केले. त्यांनी 72 तास सायकलिंग केले. 28 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता बडोदा येथील मल्हार पॉईंट येथून स्पर्धेस सुरुवात झाली.

- Advertisement -

स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 31 जानेवारी सकाळी नऊ वाजताची अर्थात 75 तासांचा अवधी देण्यात आला होता. परंतु फिरके यांनी तीन तास आधी म्हणजे केवळ 72 तासात निर्धारित अंतर पूर्ण केले. त्यासाठी त्यांनी सतत तीन दिवस, रात्र सायकल चालवली.

बडोदा ते अहमदाबाद व तेथून कच्छ जिल्ह्यातील डोलाविरा व तेथून त्यामार्गे परत बडोदा असा स्पर्धेचा मार्ग होता. स्पर्धेमध्ये एकूण 34 सायकलपटुंनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी तीन महिला होत्या. केवळ 18 स्पर्धक अवघड स्पर्धा पूर्ण करू शकले.

सहभागी सायकलपटूमध्ये सर्व जणांचे सरासरी वय 40 होते. परंतु 56 वर्षीय विजय फिरके यांनी वय कुठे आडकाठी नसते असे म्हणत पुन्हा एकदा सिद्ध केले. बहुतांश स्पर्धक सांघिकरीत्या सोबत सायकलिंग करीत होते. परंतु फिरके हे भुसावळहून एकटेच असल्याने त्यांनी अतिशय निर्धाराने व जिद्दीने एकाकीपणे ही स्पर्धा पूर्ण केली.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूने 25 हून अधिक पूल असल्याने प्रचंड चढ-उताराचा सामना करावा लागला. त्यातही कित्येक किलोमीटरचा रस्ता हा आदिवासीबहुल भागातून जात होता व निर्जन होता. त्यामुळे त्यांनी स्वतः खाण्यापिण्याचे सामान सोबत ठेवत सायकलिंग केले. शिवाय एकदा सायकल पंक्चर झाल्यामुळे व स्पर्धेच्या नियमानुसार कुठलेही बाहेरची मदत घेता येत नसल्याने त्यांनी स्वतः सायकल दुरुस्त केली. या संपूर्ण तीन दिवसांच्या प्रवासात त्यांनी केवळ पाच तास झोप घेतली.

भुसावळ स्टेशनवर सकाळी सात वाजता आल्यावर त्यांचे सूर्यकन्या तापीनदी ग्रुपतर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी निळकंठ भारंबे, किरण वाणी, दिनेश राणे, बाबुराव नागरे, संजय महाजन, योगेश ओसवाल, नरेंद्र भोळे, चंदु पाटील, काशिनाथ पाटील, पंकज पाटील उपस्थित होते.

त्यानंतर डी.एस.ग्राउंड येथे भुसावल रनर्सतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. चारुलता पाटील, आरती चौधरी, आराधना तांबे, रुपा अग्रवाल, सारिका पाटील, श्रीकांत नगरनाईक, सचिन मनवानी, कैलास छाब्रा, श्रीकांत जोशी, राजेंद्र ठाकूर, अखिलेश कनोजिया, महेंद्र पाटील, डॉ. उमाकांत चौधरी, संजय भदाणे, तरुण बीरिया, अशोक पाटील, रंजीत खरारे, प्रमोद शुक्ला, अजय पाटील, सारंग चौधरी, अभिजीत शिंदे, प्रवीण वारके, रमेशसिंग पाटील, प्रवीण पाटील हे धावपटू उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या