Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याहल्ल्यामागे मास्टरमाइंड; गोळीबारानंतर ओवेसी म्हणतात...

हल्ल्यामागे मास्टरमाइंड; गोळीबारानंतर ओवेसी म्हणतात…

लखनौ | Lucknow

एमआयएमचे (MIM) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर येथून दिल्लीला (Delhi) जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे…

- Advertisement -

या हल्ल्यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत. याप्रकरणात सचिन आणि शुभम या दोन व्यक्तींना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. हल्ल्यानंतर ओवेसी यांनी याप्रकरणी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, माझा सुरक्षा (Security) घेण्यास नकार आहे. माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी आहे. १९९४ साली मी राजकारणात (Politics) पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतलेली नाही. मला सुरक्षा घेणे आवडतदेखील नाही. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातदेखील सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन, अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली आहे.

वाढलेला मृतांचा आकडा ठरतोय डोकेदुखी; दिवसभरात ‘इतके’ पॉझिटिव्ह

ते पुढे म्हणाले की, या हल्ल्यामागे कोणीतरी मास्टरमाइंड (Mastermind) आहे. निवडणूक आयोगाकडे (Election Commission) स्वतंत्र चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रयागराजमधील धर्मसंसदेत माझा जीव घेण्यासंबंधी वक्तव्य करण्यात आले होते. हे देखील ऑन रेकॉर्ड असून याप्रकरणाची दखल घेण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.

नाशकात कॉलेज बसला भीषण अपघात; २२ जखमी

लाल आणि सफेद रंगाच्या जॅकेटमध्ये दोन हल्लेखोर होते. लाल जॅकेट घातलेल्या हल्लेखोराच्या पायावर गाडीचा टायर गेला तर सफेद जॅकेट घातलेल्या हल्लेखोराने दोन्ही फॉर्च्यूनर गाड्यांवर गोळीबार केला. आपल्याकडे एक परवाना पिस्तूल (Pistol) असून गोळीबाराच्या आवाजावरुन ती नाइन एमएम पिस्तूल किंवा इतर दुसरे होते. देशात अशाप्रकारे हल्लेखोरांना अशाप्रकारे मिळालेली सूट ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि उत्तर प्रदेश शासनाने (Uttar Pradesh Government) या प्रकरणाकडे गांभीर्याने पहिले पाहिजे. निवडणूक आयोग याबाबत दखल घेऊन चौकशी करेन अशी आशा आहे. याप्रकरणी कोर्टातही जाणार आहे. शक्य झाल्यास लोकसभा अध्यक्षांचीदेखील भेट घेईल.

Visual Story : केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत सुनील शेट्टी म्हणतात…

आज एका खासदारावर गोळी चालवण्यात आली, उद्या कोणावरही होईल. मी उत्तर प्रदेशात नेहमी प्रचारासाठी येणार आहे. प्रसिद्धीसाठी हे केले जात असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र असे नसून याबाबत चौकशी व्हावी. यामागे कोण मास्टरमाइंड आहे ज्याला माझा आणि लोकशाहीचा आवाज ऐकायचा नाही?, असे देखील ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा लसीचे प्रमाणपत्र; ‘असे’ करा डाउनलोड

- Advertisment -

ताज्या बातम्या