Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यानितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली

नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली

मुंबई | Mumbai

संतोष परब हल्ला प्रकरणी (Santosh Parab Attack Case) दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे (nitesh rane) यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आमदार नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (police Custody) सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

न्यायालयाने नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची (Police Custody) मागणी फेटाळून लावली. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नितेश राणे यांच्या वकिलांकडून आजच सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे. या अर्जावर शनिवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्र न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर लगेचच पोलिसांना नितेश राणे यांची कोठडी वाढवून हवी असल्याचे सांगितले. याप्रकरणात अजून तपास बाकी आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यासाठी आर्थिक व्यवहार झाले का, हेदेखील तपासायचे आहे. त्यासाठी नितेश राणे यांना पुण्यात नेऊन पोलीस तपास करावा लागेल. त्यामुळे नितेश राणे यांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

तसेच नितेश राणे यांनी हल्ला करण्यापूर्वी संतोष परब यांचा फोटो मुख्य आरोप सचिन सातपुतेला पाठवला होता. परंतु, नितेश राणे हे कबूल करायला नकार देत आहेत. त्यामुळे नितेश राणे यांची आठ दिवस पोलीस कोठडी हवी असल्याचेही सरकारी वकिलांनी म्हटले.

यावर नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी आक्षेप घेतला. नितेश राणे दोन दिवस पोलीस कोठडीत होते. मात्र, या काळात कोणताही तपास झाला नाही. त्यामुळे आता आम्हाला पोलीस कोठडी मान्य नाही. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात यावे, असे सतीश मानशिंदे यांनी म्हटले. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या