Friday, May 3, 2024
HomeमनोरंजनLata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु...

Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

मुंबई | Mumbai

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar)… लता मंगेशकर यांची खरंतर ओळख करुन द्यायची गरज नाही. देश-विदेशातील तब्बल ३६ वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी असंख्य गाणी गायली आहेत. त्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. तसेच, देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ही त्यांना देण्यात आला आहे. आज त्या आपल्यात नाहीत.

- Advertisement -

लता मंगेशकर यांनी प्रचंड संघर्ष करत आपलं यश संपादन केलं. हे यश मिळत असताना लतादीदींच्या अनेक हितशत्रूंनी त्यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता. हे वाचून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे. लता मंगेशकर जेव्हा ३३ वर्षांच्या होत्या. तेव्हा त्यांच्यावर विषप्रयोग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. स्वतः लता दीदींनी एका मुलाखतीत या घटनेचा खुलासा केला होता. महत्वाचे म्हणजे, त्यांच्यावर हा विषप्रयोग कोणी केला? याबाबत त्यांना कळाले होते. परंतु, पुरावा नसल्याने त्यांनी त्या व्यक्तिविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

Lata Mangeshkar : जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

काय म्हटलं होत लता मंगेशकर यांनी?

ही खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी माझ्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. मी खूप आजारी झाले होते. मी थोडेथोडके नाही जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून होते. त्यावेळी अशाही चर्चा रंगल्या होत्या की लता मंगेशकर पुन्हा गाऊ शकणार नाहीत. मात्र त्या अफवा होत्या. एकाही डॉक्टरने मला हे सांगितलं नव्हतं की तुम्हाला पुन्हा गाता येणार नाही. डॉ. आर.पी. कपूर यांनी मला बरं केलं. त्यांनी मला या आजारातून बरं केलं. तीन महिने माझं गाणंही बंद होतं. मला भयंकर अशक्तपणा आला होता. त्यावेळी मी अशक्त झाले होते की मला उठून चालताही यायचं नाही. मी भविष्यात चालू शकेन की नाही असाही प्रश्न निर्माण झाला होता.

विषबाधा कुणामुळे झाली होती हा प्रश्न विचारला असता माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते आम्हाला कळलं होतं. पण त्या व्यक्तीविरोधात आम्ही काहीही कारवाई केली नाही कराण आमच्याकडे काही पुरावा नव्हता. पण त्यावेळी त्या माणसाच्या अशा वागण्याचं आम्हाला नवल वाटलं होतं. मी आजारातून उठले तेव्हा काही काळ आराम केला. त्यांना गायचं होतं पण रेकॉर्डिंग करावं की नाही असा प्रश्न आला होता. त्यावेळी त्यांच्या घरी आले ते गायक आणि संगीतकार हेमंतकुमार त्यांच्या एका चित्रपटासाठी लतादीदींनी गावं असा त्यांचा आग्रह होता.

Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

हेमंतदा तेव्हा माझ्या आईला भेटले. माझ्या आईने परवानगी दिली पण एक अटही घातली. मी गात असताना जराही ताण येतो आहे किंवा कोणताही त्रास होतो आहे असं जाणवलं तर मला तडक घरी सोडलं जावं हेमंतकुमार यांनी ही अट मान्य केली. या आजारातून उठल्यानंतर मी बीस साल बाद या सिनेमातलं ‘कहीं दीप जले कहीं दिल’ हे गाणं गायलं असंही लता मंगेशकर यांनी सांगितलं होत.

- Advertisment -

ताज्या बातम्या