Wednesday, May 15, 2024
Homeमुख्य बातम्यासाडे तीन लोकांच्या अटकेसाठी उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?; किरीट सोमय्यांचा...

साडे तीन लोकांच्या अटकेसाठी उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?; किरीट सोमय्यांचा टोला

पुणे | Pune

भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) सध्या जोरदार वाद सुरु आहे. दोन्ही पक्षातून एकमेकांवर आरोप सुरूच आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्या शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

तसेच भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्या जागी कोठडीत जाणार आणि देशमुख बाहेर येणार असा इशाराच संजय राऊतांनी दिला आहे. आता संजय राऊत यांच्या इशाऱ्याला किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे…

रासबिहारी-मेरी लिंक रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

ते म्हणाले की, भाजपच्या साडे तीन लोकांना अटक किंवा साडे तीनशे, पण आधी आरोपांची उत्तरे द्या, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, कुणीतरी सकाळी उठून पाच पाणी पत्र लिहिणार की ईडीने (ED) त्या डेकोरेटला बोलावले होते. ज्याने माझ्या मुलीच्या लग्नाचे काम केले त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली. तर ज्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली त्याला त्यांनी प्रस्तुत केले पाहिजे. त्याने ताबडतोब पोलीस ठाण्यात तक्रार केली पाहिजे.

पत्र जाहीर करुन पाच दिवस झाले की प्रकरण संपले? म्हणून तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी की कोविड घोटाळा इतका मोठा झालेला आहे, त्यात सगळे फसले आहेत, अडकले आहेत, जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत. म्हणून साडे तीन लोक, दिड लोक आणि एक लोक… अरे बाबा मी घोटाळा केला आहे, काही गुन्हा केला आहे तर कर ना माझ्यावर कारवाई. वाट कसली पाहताय? साडे तीन लोकांना अटक करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय मुहूर्त शोधत होते काय?’ असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलेला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

आतापर्यंत खूप सहन केले, पण राजकारणातील मर्यादा आता भाजपने ओलांडली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या कोठडीत शेजारी दावा करणारे भाजपचे साडेतीन लोक हे येत्या दिवसात त्या कोठडीत दिसतील, अन् अनिल देशमुख बाहेर असतील असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या