Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedVideo छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

Video छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

औरंगाबाद – प्रतिनिधी aurangabad

शहरातील (Kranti Chowk) क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी (Minister of State Bhagwat Karad) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार इम्तिायज जलील, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, सतीश चव्हाण, विक्रम काळे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक निमित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनावरणानंतर भव्य रोषणाई आणि आतिषबाजी करण्यात आली. देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. तर चबुतऱ्याचे व परिसराचे सौदर्यींकरण महानगरपालिकेने पूर्ण केले आहे.

क्रांती चौक येथील छत्रपती शिवजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाविषयी माहिती

पुतळयाची उंची : 21 फुट

पुतळयाचे वजन : 7 मेट्रीक टन

पुतळयासाठी वापरण्यात आलेला धातु : ब्रांझ धातु (Gun Metal)

पुतळयाच्या चौथाऱ्याची उंची : 31 फुट

चौथाऱ्यासह पुतळ्याची एकुण उंची : 52 फुट

चौथाऱ्याचे बांधकाम आर.सी.सी.मध्ये असुन चौथाऱ्या भोवती स्टोन क्लॅडींग चौथाऱ्याभोवतीच्या 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती बसविण्यात आलेल्या आहेत.

चौथाऱ्याभोवतीच्या कांरजे (Cascade Fountain) तयार करण्यात आलेले आहे. तसेच हत्तीच्या सोंडेतून कारंजा सदृष्य पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

अश्वारुढ पुतळा तयार करणे रक्कम रु.: 98.00 लक्ष

चौथऱ्यांचे बांधकाम करणे रक्कम रु : 255.00 लक्ष

एकूण अंदाजपत्रकिय रक्कम रु: 353.00 लक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या