Friday, May 3, 2024
Homeनगरहल्ला करणार्‍या तिघांना अटक

हल्ला करणार्‍या तिघांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

किरकोळ कारणातून तिघांवर कोयत्याने हल्ला करणार्‍या तिघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. सोहेल चाँद शेख (वय 24), शोएब चाँद शेख (वय 24), रियाज ऊर्फ बाबा मुनीर पठाण (वय 27, सर्व रा. नागरदेवळे ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

- Advertisement -

11 जानेवारी 2022 रोजी भिंगारमधील खळेवाडीत आरोपींनी नेवीन संजय माने (वय 22), त्यांची बहिण विद्या मनोज पाखरे व भाऊ निखील संजय माने (सर्व रा. नागरदेवळे, भिंगार) यांच्यावर हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी नेवीन माने यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी फिर्यादीला म्हणाले की, तू येथे काय करतो आम्हाला माहीत आहे. त्यावर फिर्यादी म्हणाले, तुम्ही मला असे का बोललात. याच कारणावरून आरोपींनी फिर्यादी, फिर्यादीचा भाऊ व बहिणीवर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ करीत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिरसाठ यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या