Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : पुरातन वास्तूंकडे दुर्लक्ष करत स्मार्ट सिटीचा सरसकट हातोडा; पुरोहित संघाचा...

Video : पुरातन वास्तूंकडे दुर्लक्ष करत स्मार्ट सिटीचा सरसकट हातोडा; पुरोहित संघाचा आरोप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्मार्ट सिटीच्या वतीने (Smart City) गोदाघाट (Godaghat) परिसरात अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात येत आहे. यामध्ये पुरातन वास्तूंनादेखील धक्का लावला जात असल्याचा आरोप स्थानिकांसह पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे…

- Advertisement -

शनिवारी (दि. ५) निळकंठेश्वर महादेव मंदिराबाहेरील लहान मंदिरे (Temple) आणि घाटावरील पुरातन सुस्थितीत असलेल्या दगडी पायऱ्या जेसीबी मशीनद्वारे पाडण्यात आल्या. यावेळी गोदाप्रेमी, पुरोहितांसह नागरिकांनी यावर हरकत घेत काम बंद पाडल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

परिसराच्या सुशोभीकरणासाठी ठिकठिकाणी मोठमोठ्या मशीनच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे. हे सर्व करीत असताना स्मार्ट सिटीचे अधिकारी पुरातन वास्तूंकडे दुर्लक्ष करून सरसकट हातोडा फिरविण्याचे काम करीत असल्याचा आरोप पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल (Satish Shukla) यांनी देशदूतशी (Deshdoot) बोलताना केला. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी फारूक पठाण यांनी. पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या