नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी
अक्कलकुवा बसस्थानकाजवळ भरधाव बोलेरो (Bolero) गाडीने दिलेल्या धडकेत बारा वर्षीय मुलगा (boy) गंभीर जखमी (injured) झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बोलेरो चालकाविरूध्द गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -
अक्कलकुवा येथील बसस्थानकाजवळुन बोलेरो (Bolero) गाडी भरधाव वेगात गेली. या बोलेरो गाडी (क्र.जी.जे.26-टी.0218) धडक दिली असता हर्षल किसन वास्कले (Herschel Kisan Waskley) रा.राजापुरा (ता.पानसेमल मध्यप्रदेश) हा युवक गंभीर जखमी झाला तसेच त्याच्या पायासह डोक्याला दुखापत(Injury) झाली आहे.
याबाबत किसान रामा वास्कले यांनी अक्कलकुवा पोलीस (police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार बोलेरो गाडी चालक बकाराम देवजी गावीत रा.कोनाई (तालुका सोनगड,गुजरात) याच्याविरूध्द भादंवि कलम 279, 337, 338,184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.