Friday, May 3, 2024
Homeनगरकुटुंबनियोजन समुपदेशन किट वादाच्या भोवर्‍यात

कुटुंबनियोजन समुपदेशन किट वादाच्या भोवर्‍यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील नागरिकांना दोन बाळांमधील अंतर सुरक्षित ठेवावं यासाठी आशा, अंगणवाडी स्वयंसेविकांना देण्यात येणार असलेलं किट आता वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. या किटमध्ये असलेल्या वस्तू आक्षेपार्ह असल्याचा काहींचा आरोप आहे तर काही स्वयंसेविकांना यातून ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना व्यवस्थित समुपदेशनाची व्यवस्था होऊ शकते असं वाटतंय. सदर घटनेमुळे आशा वर्कर त्रस्त झाल्याचं देखील पहायला मिळत आहे.

- Advertisement -

ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना कुटुंब नियोजनासंबंधी समुपदेशन करण्यासाठी प्रसुती, प्रसुतीनंतर गर्भधारणा, लैंगिक शिक्षण, लैंगिक स्वछता याविषयी समुपदेशन तसेच शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून एक कुटुंब नियोजन समुपदेशन किट देण्यात येत आहे. पण या किटमधील साहित्य हे आक्षेपार्ह असल्याने टीका सुरू झाली आहे.

महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारचे डोके ठिकाणावर आहे की नाही? असा सवाल केला आहे. संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यानंतर आता राज्याच्या आरोग्य विभागामार्फत याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

राज्यामध्ये कुटुंब कल्याण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यांचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे. कोणत्याही पद्धतीचा वापर करण्याआधी त्याआधी त्याची सविस्तर माहिती शास्त्रीय आधारावर प्रत्येक लाभार्थ्याला माहिती असणे आवश्यक आहे. प्रात्यक्षिकासह माहिती दिली तर त्याची परिणामकारकता जास्त चांगल्या पद्धतीने होते. सरकारतर्फे दिलेले किट आशा कर्मचारी आणि आरोग्य संस्थामध्ये देण्यात येणार आहे. 25 हजार आशा कर्मचार्‍यांपर्यंत हे किट पोहचवण्यात आले आहे. या किटमध्ये कुटुंब कल्याण्याच्या वापरायच्या गोष्टींचे मॉडेल आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, नगर जिल्ह्यातही 1304 किटचे वाटप करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या