Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्या“...यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?”; संजय राऊतांची खोचक टीका

“…यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?”; संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई | Mumbai

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेनड्राईव्हच्या (Pendrive) माध्यामातून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत आज संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारलं असता त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

- Advertisement -

संजय राऊतांनी म्हटलं आहे की, त्यांच्या घरात रोज पेन ड्राईव्ह बाळंत होतात का बघावे लागेल. हा पेन ड्राईव्ह, तो पेनड्राईव्ह, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारु, असं ते म्हणाले. रोज एक खोटं प्रकरण तयार करता कसे? रोज नवीन बाळंतपण कसं जमतं काय माहीत, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्रात हे नवीनच आहे रोज नवीन एक पेनड्राईव्ह बाळंतपण होत आहे, असं ते म्हणाले.

तसेच, ज्यांना ज्यांना तुरुंगात टाकायचे आहे त्याची यादी तयार करा आणि सांगा मला या २५ लोकांना तुरुंगात टाकायचे आहे. आधी तुरुंगात टाका मग आमच्यावर आरोप करा काही हरकत नाही. महाराष्ट्र हातातून गेल्यामुळे जो तुमचा आत्मा भडकला आहे तो शांत करा. महाराष्ट्रात कुपद्धतीच्या, घाणेरड्या पद्धतीच्या कारवाया सुरु आहेत. इतक्या हलकट आणि नीच पातळीचे राजकारण कधीही झाले नाही, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या