Friday, May 3, 2024
Homeनगरबिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा जखमी

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी परिसरात बिबट्याचा वावर आहे. काही दिवसांपूर्वी चव्हाण वस्ती, अबनावे वस्ती, गायकवाड वस्ती या ठिकाणी बिबट्या असल्याचे नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिले. चव्हाण वस्ती या ठिकाणी दादासाहेब चव्हाण यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला.

- Advertisement -

कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजाने दादासाहेब चव्हाण यांचे कुटुंब जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडला असता दहा ते बारा फुटावर बिबट्या दिसला. दादासाहेब चव्हाण यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या तिथून पसार झाला. चव्हाण कुटुंबांच्या प्रसंगावधानाने कुत्र्याचा जिव वाचला. ही घटना दादासाहेब चव्हाण यांनी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांना सांगितली. त्यांनी घडलेला प्रसंग वनविभाग अधिकारी सोनावणे यांना सांगितला. याठिकाणी लवकरात लवकर पिंजरा लावून या बिबट्यास जेरबंद करण्यात यावे. अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या