Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशविधानसभेत राडा; आमदारांमध्ये हाणामारी, एकमेकांचे कपडे फाडले

विधानसभेत राडा; आमदारांमध्ये हाणामारी, एकमेकांचे कपडे फाडले

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालमधील (West Bengal Assembly) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामधील (BJP) राजकीय वैर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचाच प्रत्यय आज विधानसभेत (Bengal Assembly) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आला.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजपा आमि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या भांडणामध्ये आमदारांनी एकमेकांचे कपडेही फाडले. बीरभूम हिसांचाराच्या (Birbhum Violence) मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्यावर तृणमूल काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले यानंतर भाजप आणि टीएसमी आमदारांमध्ये भांडण झाले.

Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला ‘प्रार्थना’चा मोहक लूक, पहा फोटो

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बंगाल विधानसभेत भाजप आमदार मनोज तिग्गा (Manoj Tigga) आणि टीएमसी (TMC) आमदार असित मजुमदार (Asit Majumdar) यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या भांडणात असित मजुमदार जखमी झाले असून या प्रकरणी पाच आमदारांचं निलंबन झाल्याचं कळतंय.

Oscars 2022 : ऑस्कर सोहळ्यात राडा, सुपरस्टार ‘विल स्मिथ’ने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली… पाहा नेमकं काय घडलं

तसेच भाजप आमदारांनी (BJP MLA) आरोप केलाय की, विधानसभेत बीरभूमवर (Birbhum Violence) चर्चा करत असताना टीएमसी आमदारांनी (TMC MLA) गोंधळ घालायला सुरुवात केली आणि भाजपच्या आमदारांना मारहाण केलीय, असं त्यांनी नमूद केलंय.

- Advertisment -

ताज्या बातम्या