Friday, May 3, 2024
HomeUncategorizedमसाल्याचे गणित बिघडले ; लाल मिरची महागली

मसाल्याचे गणित बिघडले ; लाल मिरची महागली

औरंगाबाद – aurangabad

उन्हाचा पारा वाढलेला असतानाच लाल मिरची (Red pepper) खरेदीसाठी ग्राहकांची मोठी लगबग बाजारात पाहण्यास मिळत आह. घरगुती तिखट तसेच मसाला तयार करण्यासाठी म्हणून लाल मिरचीला मोठी मागणी (Great demand for chillies) वाढली आहे. तुलनेत आवक कमी असल्याने भाव चांगलेच वधारल्याचे चित्र आहे. अवघ्या चाळीस दिवसांतच लवंगी, गुंटूर, चपाटासह रसगुल्लाच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

लाल तिखट असो की विविध प्रकारचे तयार मसाले (Spices) बाजारात, किराणा दुकानात उपलब्ध आहेत. मात्र असे असतानाही उन्हाळा सुरू होताच वर्षभर पुरेल इतका लाल तिखट, घरगुती मसाला तयार करून घेण्यावर अनेकांचा भर असतो. चांगल्या प्रकारे वाळलेली लाल मिरचीची आवक जानेवारीपासून बाजारात उपलब्ध झाली आहे. स्थानिक भागासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी भागांतून लाल मिरचीची प्रामुख्याने आवक होते. यंदा स्थानिकची आवक नाममात्र असून यंदा प्रामुख्याने तेलंगण भागातून आवक होत असली, तरी दरवर्षीच्या तुलनेत आवक कमीच आहे. परिणामी, लाल मिरचीचे भावही वाढले आहे, अशी माहिती विक्रेते दिलीप तातडे यांनी सांगितले.

बाजारात ब्याडगी, गुंटूर, तेजा, चपाटा, रसगुल्ला, काश्मिरी, संकेश्वरीसह मागणी असलेली तिखट लवंगी मिरची उपलब्ध आहे. खरेदीसाठी काही दिवसापासून ग्राहकांची मोठी रेलचेल दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीचे भाव दर्जानुसार ८ ते १५ टक्क्यांनी वाढलेले असतानाच, चाळ‌ीस दिवसांतच लवंगी, गुंटूरच्या दरात किलोमागे सुमारे २० रुपयांची, चपाटाच्या दरात ३० ते ४० रुपयांची तर रसगुल्लाच्या दरात तब्बल ९० ते १०० रुपयांची दरवाढ झाल्याचे चित्र आहे.

असे आहेत लाल मिरचीचे दर (किलोप्रमाणे, रुपयांमध्ये)

लवंगी १८०-२००

ब्याडगी ३२०-३५०

गुंटूर २२०-२४०

चपाटा २५०-३००

रसगुल्ला ४५०-५००

तेजा २००-२३०

संकेश्वरी ३५०-४००

काश्मिरी ३००-३५०

- Advertisment -

ताज्या बातम्या