Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रसदावर्तेंना दिलासा नाहीच; काय घडले आज कोर्टात?

सदावर्तेंना दिलासा नाहीच; काय घडले आज कोर्टात?

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) हल्ला चढवला. याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना किल्ला न्यायालयाने (Killa Court) दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावली होती….

- Advertisement -

दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने सदावर्ते यांना आज पुन्हा गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. तसेच या प्रकरणात किल्ला न्यायालयाने शुक्रवारी इतर १०९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सरकारी वकील प्रदीप घरत (Pradeep Gharat) यांनी आज सुनावणी दरम्यान अनेक खळबळजनक दावे केले. हल्ल्याच्या दिवशी सदावर्तेंनी नागपूरमध्ये (Nagpur) दोन फोन केले, असा दावा त्यांनी केला.

त्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी यावेळी ॲड. प्रदीप घरत यांनी केली. या घटनेत आणखी ४ जण गुंतलेले आहेत, अशी माहिती घरत यांनी कोर्टात दिली.

सदावर्ते चौकशीला पूर्णपण सहकार्य करत नाही, तसेच चंद्रकांत सूर्यवंशी याचे नाव चौकशीत समोर आल्याचे ॲड. प्रदीप घरत यांनी सांगितले. सदावर्ते यांनी मीडियाला आपल्या योजनेची माहिती दिली होती.

त्याचदिवशी त्यांनी सकाळी नागपूरला एक कॉल केला. फोन कोणाला केला हे शोधून काढायचे आहे. धक्कादायक म्हणजे या हल्ल्याआधी एक बैठक झाली. या बैठकीत सिल्व्हर ओकवर हल्ला करण्याचे ठरले होते.

अभिषेक पाटील (Abhishek Patil) नावाचा एक एसटी कर्मचारी (ST Workers) सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावले. याप्रकरणी चार जणांचा ताबा पाहिजे असे ॲड. प्रदीप घरत यांनी सांगितले.

सदावर्ते यांच्या मोबाईलवरून 31 मार्चला बोलणे झाले, मात्र त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ते सिमकार्ड त्यांनी नष्ट केले, ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी 11.35 वाजता सदावर्ते यांनी नागपूरला व्हॉट्सॲप कॉल केला, त्यानतंर परत 1.30 त्यांनी नागपुराला पुन्हा कॉल झाला, आणि पत्रकार पाठवा असे ते कॅलमध्ये म्हणाले अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांच्या युक्तीवादानंतर गुणरत्न सदावर्ते यांचे वकील अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला. सदावर्तेंनी पैसे घेतले असा आरोप केला जात आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी तशी तक्रार केली आहे का? 530 रुपयांप्रमाणे जर प्रत्येक व्यक्तीकडून जमवले 1. 50 कोटीहून अधिक जमले असतीलही. मात्र याबाबत एकही कर्मचाऱ्यांनी तक्रार केलेली नाही असा दावा ॲड. कुलकर्णी यांनी केला.

कर्मचारी आत्महत्या करत होते मात्र त्यांच्याबद्दल साधी सहानुभूतीदेखील कोणाला नव्हती, एसटी कर्मचारी क्लायंट होते म्हणून सदावर्ते यांच्या घराबाहेर जमा होत होते असे ॲड. कुलकर्णी कोर्टात सांगितले.

तसेच धक्काबुक्कीत पोलीस (Police) कर्मचारी जखमी झाला, कर्मचारी तिथे मारामारी करायला गेले नव्हते, कर्मचाऱ्यांचा हेतू लक्षात घ्या त्यांना कोणता गंभीर गुन्हा करायचा नव्हता.

हल्ला होणार हे पोलिसांना माहीत होते मग पोलीस बंदोबस्त का नव्हता? असा सवालदेखील उपस्थित केला. ज्या दिवशी घटना घडली होती तेव्हा सदावर्ते घटनास्थळी नव्हते, चंद्रकांत सूर्यवंशी या पत्रकाराशी बातचीत केल्याचे सांगतात, मात्र ती घटना सर्व मीडियाने हे कव्हर केली.

सदावर्ते यांच्यावर केलेले आरोप साफ चुकीचे असून ज्या फोनबाबत आणि सिमकार्डबाबत पोलीस बोलत आहेत त्या सिमकार्डची (Sim Card) वॅलिडिटी ३१ मार्चपर्यंत होती म्हणुन त्या दिवसापर्यंतच वापरला आणि त्या नंतर तो फोन देखील वापरण्यात आला नाही असा युक्तीवाद ॲड. कुलकर्णी यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या