Monday, May 6, 2024
Homeनगरचांदेकसारे बाल भैरवनाथाची यात्रेची कुस्त्यांच्या हगाम्याने सांगता

चांदेकसारे बाल भैरवनाथाची यात्रेची कुस्त्यांच्या हगाम्याने सांगता

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रेची सांगता काल कुस्ती हगामाने करण्यात आली.

- Advertisement -

शेवटची मानाची कुस्ती कै. बाजीराव जयराम गुरसळ यांच्या स्मरणार्थ पै. संजय गुरसळ यांनी पाच हजार रुपये दिले होते. ती कुस्ती शाम मुर्तडक व भगवान कोताडे यांच्यात झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटल्याने त्यांना बक्षीस विभागून देण्यात आले. गुरुवार दि. 14 रोजी बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावर्षी यात्रेचा मान कसारेकर चांदेकर यांना होता. त्यांना चांदे म्हणजे होन यांनी मदत केली. श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्ट, भैरवनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा संपन्न करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी पंचामृताने बालभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांना पुरोहितांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. शुक्रवारी रात्री नऊ वाजता मंदिर परिसरात शोभेच्या दारुची भव्य आतिषबाजी करण्यात आली. दहा वाजता पुणे येथील जलवा आर्केस्ट्राने आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

या यात्रेला 1200 वर्षाची परंपरा असल्याने महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांनी बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचे दर्शन घेतले. यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी चांदेकसारे भैरवनाथ यात्रा कमिटी, श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्ट व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

माता जोगेश्वरी व बाल भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी ना. आशुतोष काळे व माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी हजेरी लावली. तालुक्यात सुखशांती नांदावी यासाठी त्यांनी भैरवनाथाला साकडे घातले.

- Advertisment -

ताज्या बातम्या